IPL 2023 स्पर्धेत 'या' खेळाडूंना विश्रांती द्या! BCCI फ्रँचाईसींना विनंती करण्याची शक्यता

IPL 2023 : आयसीसी स्पर्धांमध्ये गेल्या 9 वर्षात भारताची कामगिरी सुमार राहिली आहे. वनडे वर्ल्डकप, टी 20 वर्ल्डकप, कसोटी चॅम्पियनशिप, आशिया कप स्पर्धा यात भारतीय संघाने अक्षरश: नांगी टाकली आहे. त्यामुळे पराभवानंतर ट्रोलर्स आयपीएल स्पर्धेला दोषी धरतात. वारंवार होणारी टीका पाहता आता बीसीसीआय (BCCI) देखील सावध पवित्रा घेताना दिसत आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत महत्त्वाच्या खेळाडूंवर दबाव येऊ नये यासाठी बीसीसीआयने फ्रँचाईसीकडे विनंती केल्याचं बोललं जात आहे. 

Jan 03, 2023, 17:09 PM IST
1/5

Virat Kohli

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. विराटला सध्या सूर गवसला असून आशिया कप आणि टी 20 वर्ल्डकपमध्ये चांगली खेळी केली आहे. मात्र वर्ल्डकपपूर्वी आयपीएल स्पर्धा असल्याने त्याच्या दबाव वाढू नये अशी अपेक्षा आहे. असं असलं तरी विराट बंगळुरू संघाचा कणा आहे. 

2/5

Rohit Sharma

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळाणारा रोहित शर्मा हा यशस्वी कर्णधार आहे. भारतीय संघाचं कर्णधारपद  देखील रोहित शर्माकडे आहे. गेल्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली नव्हती. रोहित शर्माला आराम दिल्यास मुंबई संघांवर दडपण येईल. 

3/5

Hardik Pandya

हार्दिक पांड्या सध्या चांगलाच फॉर्मात आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने जोरदार कमबॅक केलं आहे. हार्दिक गुजरात टायटन्सचा कर्णधार असून पहिल्या स्पर्धेतच गुजरातनं जेतेपद पटकावलं होतं. जर स्पर्धेत पांड्या खेळला नाही तर गुजरातचं मोठं नुकसान होईल. 

4/5

Ravindra Jadeja

रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. चारवेळा जेतेपद पटकावून देण्यात जडेजाची महत्त्वाची भूमिका आहे. सध्या दुखापतीमुळे जडेजा क्रिकेटपासून दूर आहे. मात्र दुखापतीतून सावरून लवकरच संघात परतेल असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे. 

5/5

In IPL 2023, the BCCI could request franchisees to rest the top 5 players of India for ahead of ODI World Cup Cricket News Marathi

जसप्रीत बुमराह भारतीय संघाच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र आहे. मात्र दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. मुंबई संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. बुमराह 2023 आयपीएल स्पर्धा खेळला नाही तर संघाचं फटका बसू शकतो.