10 वर्ष तुरुंगवास, 3 लाखांचा दंड आणि... महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात एकदम कडक कायदा

महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.  हा कायदा राज्यात लागू करण्याबाबत सरकारची तयारी सुरु आहे. नेमका हा लव्ह जिहाद कायदा काय असेल. जाणून घ्या. 

Aug 03, 2023, 23:55 PM IST

Maharashtra Love Jihad Law : देशात आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यातल्या धर्मांतराच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेतच याची ग्वाही दिली आहे.

1/5

राज्यात हिंदू संघटना आक्रमक होत रस्त्यावर उतरल्याचं चित्र वारंवार दिसतंय.  प्रामुख्याने या हिंदू संघटना लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाल्यात.. राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात यावा अशी मागणी हिंदू संघटना रस्त्यावर उतरून करत आहेत. 

2/5

पीडित मुलगी अल्पवयीन असेल तर 4 ते 7 वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी 3 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

3/5

जबरदस्तीने धर्मांतर केल्यास 1 ते 5 वर्षांच्या तुरुंगवासासह 15,000 रुपये दंडाची शिक्षा होवू शकते. 

4/5

 या कायद्याअंतर्गत आरोपीला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 

5/5

मुलीचा धर्म बदलण्याच्या उद्देशाने केलेला विवाह या कायद्याअंतर्गत रद्द करण्यात येणार आहे.