नितीन देसाई यांच्या मृत्यूचे गूढ उकलणार? त्या 11 ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं आहे तरी काय?

ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी सरकार करणार आहे. आत्महत्येआधी नितीन देसाई यांनी 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती समोर आली. या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे? त्यातून त्यांच्या आत्महत्येचं गूढ उकलेल का?

Aug 03, 2023, 23:42 PM IST

Nitin Desai Death:  बॉलिवूडच्या सिनेमांपासून ते टीव्ही मालिकांपर्यंत आणि राजकीय सभांपासून गणेशोत्सव मंडळांच्या सजावटीपर्यंत भव्यदिव्य, दिमाखदार सेट उभारणारे नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येमुळं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. गळफास घेतल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टेम रिपोर्टमधून स्पष्ट झाल आहे. कर्जबाजारीपणामुळं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. त्यांच्या मृत्यूचे विधानसभेतही पडसाद उमटले. तेव्हा आत्महत्येच्या सखोल चौकशीची घोषणा गृहमंत्र्यांनी केली. आत्महत्येआधी नितीन देसाई यांनी 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. या 11 ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं आहे तरी काय? 

1/6

नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्येपूर्वी ११ ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्याची चर्चा आहे.

2/6

नितीन देसाई यांच्या ऑडिओ क्लिपमधून आत्महत्येचं कारण स्पष्ट होईल, असा अंदाज आहे.

3/6

एनडी स्टुडिओचा ताबा कर्ज देणा-या कंपन्यांकडं जाऊ नये त्याऐवजी राज्य सरकारनं एनडी स्टुडिओ ताब्यात घ्यावा आणि नव्या कलावंतांना भव्य कलामंच उपलब्ध करून द्यावा, असा उल्लेखही त्या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचं समजतंय

4/6

एनडी स्टुडिओ नितीन चंद्रकांत देसाईनं नाही, तर एका मराठी माणसानं उभा केलेला कलामंच आहे. 

5/6

उद्योजकांची नावंही त्यात असल्याचं समजतंय कर्ज देणा-या कंपन्यांनी आर्थिक फसवणूक केली आणि वसुलीसाठी छळ केला, असंही त्यांनी म्हटलंय.

6/6

लालबागच्या राजाला माझा अखेरचा प्रणाम, असा उल्लेख त्यात आहे.