Team India च्या नव्या जर्सीनं जागवल्या जुन्या आठवणी

Nov 24, 2020, 20:01 PM IST
1/6

Team India च्या नव्या जर्सीनं जागवल्या जुन्या आठवणी

भारतीय क्रिकेट संघ team india सध्या australia ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आहे. दोन्ही संघ 27 नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय, तीन टी -20 आणि चार कसोटी सामने खेळणार आहेत. 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत सिडनी आणि कॅनबेरा येथे एकदिवसीय आणि टी -20 मालिका खेळल्या जातील.   

2/6

Team India च्या नव्या जर्सीनं जागवल्या जुन्या आठवणी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा नवा लूक पाहायला मिळणार आहे. अर्थात हा लूक असणाऱ आहे संघाच्या नव्या जर्सीमुळं.   

3/6

Team India च्या नव्या जर्सीनं जागवल्या जुन्या आठवणी

सूत्रांच्या माहितीनुसार निर्धारित षटकांच्यास सामन्यांसाठी ही नवी जर्सी खेळाडू वापरताना दिसतील. 1992  संघानं परिधान केलेल्या जर्सीसारखीच ही नवी जर्सी आहे. त्यामुळं सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमी गतकाळातील आठवणींमध्ये रममाण झाले आहेत.   

4/6

Team India च्या नव्या जर्सीनं जागवल्या जुन्या आठवणी

संघातील काही खेळाडूंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून या जर्सीतील फोटो शेअर केले आहेत. या नव्या जर्सीवर संघासाठीच्या स्प़ॉन्सरची नावं स्पष्टपणे दिसत आहेत. ज्यामध्ये क्रिकेट बोर्डाच्या चिन्हासह  एमपीएल, बैजूज इंडिया यांची नावं दिसत आहेत.   

5/6

Team India च्या नव्या जर्सीनं जागवल्या जुन्या आठवणी

फक्त भारतीय क्रिकेट संघच नव्हे, तर ऑस्ट्रेलियाचा संघही यादरम्यान नव्या जर्सीमध्ये दिसेल. टी20 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघानं नव्या जर्सीला प्राधान्य दिलं आहे.   

6/6

Team India च्या नव्या जर्सीनं जागवल्या जुन्या आठवणी

( सर्व छायाचित्रे- सोशल मीडिया )