MS Dhoni च्या शेतातील टोमॅटोची विक्री सुरु

Nov 24, 2020, 16:10 PM IST
1/5

MS Dhoni च्या शेतातील टोमॅटोची विक्री सुरु

आयपीएलच्या IPL 2020  यंदाच्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली मैदानात आलेला चेन्नईचा संघ फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. पण, पराभवानं निराश न होता सध्या माही रमला आहे एका नव्या भूमिकेत. ही नवी भूमिका आहे, शेतकऱ्याची. काही महिन्यांपूर्वीच माहिचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो ट्रॅक्टर चालवताना दिसला होता. मुख्य म्हणजे ते फक्त जाहिरातीसाठी नव्हे, तर खऱोखरच त्या वाहनाचा शेतीसाठी वापर होत होता. 

2/5

MS Dhoni च्या शेतातील टोमॅटोची विक्री सुरु

जवळपास 3 वर्षांपूर्वी माहीनं धुर्वास्थित सेंबो फार्म हाऊसमध्ये शेती आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनाचं काम हाती घेतलं होतं. आता इथं भाज्याही उगवल्या जात आहेत. 

3/5

MS Dhoni च्या शेतातील टोमॅटोची विक्री सुरु

माही सध्या त्याच्या कुटुंबासमवेत दुबईमध्ये असला तरीही त्याच्या फार्महाऊसमधील दुग्ध उत्पादनं आणि टोमॅटोची विक्री होण्यास सुरुवात झाली आहे. प्रती किलो 40 रुपये असे या टोमॅटोचे दर असल्याची माहिती समोर मिळत आहे. 

4/5

MS Dhoni च्या शेतातील टोमॅटोची विक्री सुरु

इतकंच नव्हे तर, येत्या काही दिवसांमध्ये येथील कोबी आणि फ्लॉवरच्या उत्पादनाची विक्रीही सुरु होणार आहे. या ठिकाणी ब्रोकोली आणि स्ट्रॉबेरीचीही शेती सुरु आहे. 

5/5

MS Dhoni च्या शेतातील टोमॅटोची विक्री सुरु

धोनी इतक्यावरच थांबलेला नाही. तर, त्यानं मध्यप्रदेशातील झाबुआमधून 2 हजार कडकनाथ कोंबडीची पिलंही मागवली होती. ज्यांचीही विक्री पुढील काही दिवसांमध्ये होणार आहे.