जखमी Rohit Sharmaला पाहून पत्नीची भावूक पोस्ट, वाचून डोळ्यात येईल पाणी

Ind vs Ban : तुम देना साथ मेरा ओ हम नवा...! Rohit Sharma साठी पत्नीनं उचललेलं पाऊल पाहून व्हाल भावुक  

Dec 08, 2022, 12:40 PM IST

Rohit Sharma Injury IND vs BAN :  बांगलादेशविरुद्धची (IND vs BAN) वनडे मालिका गमावल्यानंतर आता भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) आणि कुलदीप सेन (Kuldeep Sen) दुखापतीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडले आहेत.  रोहित शर्माच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयातही नेण्यात आले होते. या सगळ्यानंतरही रोहित मैदानात फलंदाजीसाठी आला. रोहितची ही लढाऊ खेळी पाहून त्याची पत्नी रितिका सजदेहने (Ritika Sajdeh) तिच्या इन्स्टास्ट्रीवर (Insta Story) एक भावनिक पोस्ट (Post) शेअर केली.

1/5

 Ind vs Ban , IND VS BAN, KL RAHUL, RITIKA SAJDEH, ROHIT SHARMA

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जखमी अंगठ्याचा फोटो शेअर करत रितिका सजदेहने  (Ritika Sajdeh) लिहिले, मी तुझ्यावर प्रेम करते आणि मला तुझा अभिमान आहे. 

2/5

 Ind vs Ban , IND VS BAN, KL RAHUL, RITIKA SAJDEH, ROHIT SHARMA

संघ संकटात सापडलेला पाहून रोहित शर्माने या सामन्यात 9व्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने 28 धावांवर 51 धावांची नाबाद खेळीही खेळली, मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या खेळीत त्याच्या बॅटने 3 चौकार आणि 5 षटकारही मारले.  

3/5

 Ind vs Ban , IND VS BAN, KL RAHUL, RITIKA SAJDEH, ROHIT SHARMA

रोहित शर्माच्या अंगठ्याचे हाड तुटलेले नाही, पण अंगठा निखळला आहे. या दुखापतीमुळे तो पुढील सामन्यात खेळताना दिसणार नाही.  

4/5

 Ind vs Ban , IND VS BAN, KL RAHUL, RITIKA SAJDEH, ROHIT SHARMA

रितिका सजदेहही रोहित शर्माची मॅनेजर आहे. या दौऱ्यावर ती फक्त रोहित शर्मासोबत दिसते, पण यावेळी ती एकत्र गेली नाही.  

5/5

 Ind vs Ban , IND VS BAN, KL RAHUL, RITIKA SAJDEH, ROHIT SHARMA

उभय संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमावून 271 धावा केल्या. या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाला (Team India) 9 गडी गमावून 266 धावाच करता आल्या.