IND VS ENG: चेन्नई टेस्टमध्ये अश्विनचा नवा रेकॉर्ड, हरबजनलाही धाडलं मागे

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विननं मोलाची कामगिरी केली आहे. पहिल्याच डावात अश्विननं इंग्लंड संघाला जेरीस आणलं होतं. अवघ्या 43 धावांमध्ये अश्विननं 5 विकेट्स एकाच डावात आपल्या नावावर केल्या आहेत. आतापर्यंत अश्विननं असे अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत त्याविषयी जाणून घेऊया.  

Feb 14, 2021, 19:47 PM IST
1/4

रविचंद्रन अश्विननं  एकाच डावात 5 विकेट घेऊन चमकदार कामगिरी केली. कसोटी सामन्यात एकाच डावात 5 विकेट्स घेणारा अश्विन जगातला पाचवा स्पिनर गोलंदाज ठरला आहे. त्याने 29 व्या वेळा पुन्हा हा पराक्रम केला आहे. सर्वात पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुथैया मुरलीधरन (67) त्यानंतर शेन वॉर्न (37) अनिल कुंबळे (34) रंगना हेराथ (34) आणि त्यानंतर आता अश्विनलाही या यादीत स्थान मिळालं आहे. (फोटो क्रेडिट - BCCI)   

2/4

 कसोटी सामन्यात 200 वेळा डाव्या हाताने विकेट घेणारा जगातील पहिला स्पिनगर गोलंदाज अश्विन ठरला आहे. डाव्या हाताच्या फलंदाजांमध्ये डेव्हिड वॉर्नर (10) सर्वाधिक वेळा बळी ठरला आहे. त्यापाठोपाठ अ‍ॅलिस्टर कुक (9), बेन स्टोक्स (9), एड कोवान (7) आणि जेम्स अँडरसन (7) यांचा क्रमांक लागतो. (फोटो क्रेडिट - BCCI)

3/4

 रविचंद्रन अश्विनने घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या 45 कसोटी सामन्यांमध्ये 23 वेळा डावात 5 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. 89 कसोटी सामन्यात जेम्स अॅन्डरसनने याआधी 22 वेळा 5 विकेट घेण्याचा विक्रम केला होता. मात्र हा विक्रम आता अश्विननं मोडून काढला आहे. या यादीमध्ये आघाडीवर मुथय्या मुरलीधरन (45) त्यानंतर रंगाना हेराथ (26), अनिल कुंबळे (25) आहेत.  

4/4

रविचंद्रन अश्विन भारतीय भूमीवरील कसोटी क्रिकेटमधील दुसर्‍या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने भारतात 266 बळी पूर्ण केले आणि हरभजन सिंगचा (265) विक्रम मोडला. या यादीत अग्रस्थानी अनिल कुंबळे आहे. त्याने 24.88 च्या सरासरीने 350 बळी घेतले आहेत.