IND vs ENG: अहमदाबाद कसोटीत टीम इंडियाच्या 5 खेळाडूंनी पलटवली बाजी

इंग्लंड विरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेवर भारतीय संघानं 3-1 ने दणदणीत विजय मिळवला. या मालिकेत विराट कोहली शुभमन गिल नाही तर 5 खेळाडूंनी संपूर्ण सीरिजमधील बाजी पलटवत मालिका जिंकवली आहे. 

Mar 07, 2021, 09:23 AM IST

इंग्लंड विरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेवर भारतीय संघानं 3-1 ने दणदणीत विजय मिळवला. या मालिकेत विराट कोहली शुभमन गिल नाही तर 5 खेळाडूंनी संपूर्ण सीरिजमधील बाजी पलटवत मालिका जिंकवली आहे. 

1/5

वॉशिंगटन सुंदर

वॉशिंगटन सुंदर

पंतच्या पावलांवर पाऊल ठेवून वॉशिंग्टन सुंदरने 117 चेंडूत 60 धावा पूर्ण केल्या. दुसर्‍या दिवसाच्या खेळाच्या शेवटी तो बाहेर नव्हता. दुसर्‍या दिवशीही त्याची फलंदाजी चांगलीच राहिली आणि त्याने उत्कृष्ट कामगिरी दाखवली.  सुंदरने 174 चेंडूत नाबाद 96 धावांची खेळी साकारली. अवघ्या 4 धावांसाठी त्याचं शतक हुकलं. त्याच्या या कामगिरीमुळे मात्र त्याचं चाहत्यांकडून तुफान कौतुक होत आहे. 

2/5

ऋभष पंत

ऋभष पंत

25 धावांनी भारतीय संघानं इंग्लंडवर विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघाचा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीमध्ये ऋभष पंतनं पडता खेळ सावरला आहे. 118 चेंडूमध्ये त्यानं 13 चौकार, 2 षटकार मारत 101 धावा पूर्ण केल्या. कसोटी करियरमधील ऋषभचं हे तिसरं शतक आहे. 

3/5

आर अश्विन

आर अश्विन

भारताचा दिग्गज स्पिनर रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत या संपूर्ण मालिकेत अक्षरश: धुमाकूळ घातला. इंग्लंड संघाच्या दांड्या गुल करत त्यांना एकामागोमाग तंबूत धाडलं. चेंडू असो की बॅट, अश्विनने दोघांकडून समान योगदान दिलं. चौथ्या कसोटी सामन्यात अश्विन हा भारतासाठी मोठा गेम चेंजर ठरला. या सामन्यात अश्विनने एकूण 8 गडी बाद केले. पहिल्या डावात त्याने 8 विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात अश्विनने 5 विकेट्स घेतल्या.

4/5

अक्षर पटेल

अक्षर पटेल

अक्षर पटेलनं संपूर्ण सामन्यात 9 विकेट्स घेतल्या. अहमदाबादमधील चौथा कसोटी सामना जिंकण्यात अक्षरनं महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे त्याचंही चाहत्यांकडून कौतुक होत आहे. 

5/5

रोहित शर्मा

रोहित शर्मा

रोहित शर्मानं दुसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्या आपली उत्तम कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीमध्ये त्यानं शतक ठोकत डाव सावरला तर चौथ्या कसोटी सामन्यामध्ये 49 धावा करत आपली महत्त्वाची भूमिका निभावली. बेन स्टोक्सनं रोहितला एलबीडब्ल्यू आऊट केल्यानं केवळ एक धावासाठी अर्धशतक हुकलं.