Rajat Patidar Ind vs Nz: श्रेयस अय्यरच्या जागी संधी मिळालेला रजत पाटीदार आहे तरी कोण?

IND vs NZ Who is Rajat Patidar: श्रेयस अय्यर जखमी झाल्याने भारताला मालिका सुरु होण्याआधीच मोठा धक्का बसला असून रजत पाटीदारला श्रेयसची रिप्लेसमेंट म्हणून संघात स्थान देण्यात आलं असून पाटीदारने यापूर्वी घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामिगिरी केली आहे.

Jan 18, 2023, 13:16 PM IST

IND vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याची मालिका (IND vs NZ) आजपासून सुरु होत आहे. मात्र या मालिकेआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (shreyas iyer) जखमी झाल्याने मालिकेमधून बाहेर पडला आहे. श्रेयसच्या जागी रजत पाटीदारला (Rajat Patidar) संघात स्थान देण्यात आलं आहे. पण हा रजत पाटीदार आहे तरी कोण जाणून घेऊयात...

1/10

india vs new zealand odi series who is rajat patidar

29 वर्षीय रजत पाटीदारचा जन्म इंदूरमध्ये झाला आहे. तो स्थानिक स्तरावर मध्य प्रदेशकडून खेळतो. पाटीदार एका उद्योजक कुटुंबातील आहे.  

2/10

india vs new zealand odi series who is rajat patidar

वयाच्या आठव्या वर्षापासूनच रजतने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने आपल्या आजोबांच्याच क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

3/10

india vs new zealand odi series who is rajat patidar

विशेष म्हणजे पाटीदारने आपल्या करियरची सुरुवात ऑफ-ब्रेक स्पिनर म्हणून सुरु केली होती. मात्र अंडर-15 नंतर त्याने त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केली आणि आता तो स्पेशलिस्ट बॅटर म्हणून ओळखला जातो.

4/10

india vs new zealand odi series who is rajat patidar

रजत पाटीदारने नोव्हेंबर 2015 मध्ये प्रथमिक स्तरावरील क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर एका महिन्यातच त्याने ए लिस्टेड करियरची सुरुवात केली.  

5/10

india vs new zealand odi series who is rajat patidar

सन 2018-19 ला रणजीमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. या पर्वात त्याने मध्य प्रदेशकडून खेळताना आठ सामन्यांमध्ये 54.84 सरासरीने 713 धावा केल्या.

6/10

india vs new zealand odi series who is rajat patidar

सन 2021 मध्ये त्याला पहिल्यांदा इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना त्याला खास कामगिरी करता आली नाही.

7/10

india vs new zealand odi series who is rajat patidar

आयपीएलच्या मागील पर्वामध्ये रजतने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून 112 धावांची नाबाद खेळी केली तेव्हा तो चांगलाच चर्चेत आला होता.

8/10

india vs new zealand odi series who is rajat patidar

रजत पाटीदारला घरगुती क्रिकेटमधील रन-मशीन म्हणूनही ओळखलं जातं. पाटीदारने 50 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 46.43 च्या सरासरीने 3 हजार 668 धावा केल्या. यामध्ये 11 शतकांबरोबर 20 अर्धशतकांचा समावेश आहे.

9/10

india vs new zealand odi series who is rajat patidar

ए लिस्टेड क्रिकेटमध्ये पाटीदारने 51 सामन्यांमध्ये 34.33 च्या सरासरीने 1 हजार 638 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकं आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे.

10/10

IND vs NZ 1st ODI :  Who is Rajat Patidar Shreyas Iyer Replacement in team india as batter

टी-20 मध्ये पाटीदारने एकूण 44 डावांमध्ये 37.58 च्या सरासरीने 1 हजार 466 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. 2023 च्या आयपीएलच्या पर्वामध्ये रजत पाटीदार आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे.