#15august2023 : पंतप्रधानांच्या फेट्याची शान कायम! पाहा गेल्या 10 वर्षांतील मोदींचा लाल किल्ल्यावरील लूक

Independe Day 2023 : भारताचा स्वातंत्र्यदिन गल्लीपासून दिल्लीपर्यंत साजरा केला जातो. यंदाही लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळीही त्यांची फेट्याची शान कायम दिसली. 

Aug 15, 2023, 08:33 AM IST

Independe Day 2023 : देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना आणि मातृभूमीच्या, रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना कोटी कोटी प्रणाम करत  पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi speech) यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केलं. किल्लावर ध्वजारोहण (#IndianFlag) करताना यंदाही मोदीं यांची फेट्याची शान कायम होती. रुबाबदार अंदाज आणि त्यांचे फेटे...गेल्या 10 वर्षांतील मोदींचा लाल किल्ल्यावरील लूकवर एक नजर टाकूयात. (independence day 2023 pm modi feta at 15 august Red Fort)

1/10

2014 मध्ये मोदींचा लूक

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर 2014 मध्ये प्रथमच पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्लावर ध्वजारोहण केलं. त्यावेळी ते लाल रंगाच्या फेटामध्ये दिसून आले. 

2/10

2015 मध्ये मोदींचा लूक

दुसऱ्या वर्षी 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिवळ्या रंगाचा फेटा बांधून लाल किल्ल्यावर आले होते.     

3/10

2016 मध्ये मोदींचा लूक

तिसऱ्या वर्षी 2016 मध्ये मोदींनी लाल किल्ल्यावर राजस्थानी फेटा बांधून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. गुलाबी रंगाचा हा फेट्यामध्ये मोदींचा रुबाब काही औरच वाटत होता. 

4/10

2017 मध्ये मोदींचा लूक

चौथ्या वर्षीही मोदींची फेटाची शान कायम होती. 2017 ला मोदींनी लाल आणि पिवळ्या रंगाचा चौकटींची डिझाइचा फेटा बांधून देशाला संबोधित केलं. 

5/10

2018 मध्ये मोदींचा लूक

त्यानंतर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांधलेल्या केशरी रंगाचा फेट्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.   

6/10

2019 मध्ये मोदींचा लूक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  2019 मधील स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी बहुरंगी फेट्याला बांधला होता.

7/10

2020 मध्ये मोदींचा लूक

भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केशरी आणि क्रिम रंगाचा फेटामधील लूक एकदम उठून दिसत होता. 

8/10

2021 मध्ये मोदींचा लूक

त्यानंतर 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या रंगाचा फेटा बांधला होता. 

9/10

2022 मध्ये मोदींचा लूक

गेल्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृतोत्सव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढऱ्या रंगाचा फेटा बांधला होता. मोदी यांच्या पांढऱ्या रंगाच्या फेट्यावर केशरी आणि हिरव्या रंगाच्या छटा प्रचंड देशाची शान दिसून येतं होती.

10/10

2023 मध्ये मोदींचा लूक

यावर्षी मोदींनी राजधानी फेटा बांधला होता. लाल आणि पिवळ्या रंगावर बांधणी नक्षीकाम असलेला फेट्यामध्ये मोदींची शान सलग 10व्या वर्षी कायम होती.