I Love My India... स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष; मुंबईसह देशभरात शानदार तिरंगी रोषणाई

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशभरात तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आलेय. पाहा देशभरातील विविध ठिकाणचे फोटो.

Aug 14, 2023, 23:58 PM IST

Independe Day 2023 :  देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष पहायला मिळत आहे. भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने संपूर्ण देश तिरंगी रंगात न्हाऊन निघाला आहे. मुंबईसह देशभरात प्रमुख रेल्वे स्थानकं तसंच प्रसिद्ध ठिकाणांवर तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आलेय. 

1/5

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे. 

2/5

दिल्ली रेल्वे स्थानकातील मनमोहक तिरंगी रोषणाई. 

3/5

चेन्नई रेल्वे स्थानकातील तिरंगी रोषणाई. 

4/5

महाराष्ट्रातील नागपूर रेल्वे स्थानकातील तिरंगी रोषणाई. 

5/5

तेलंगणा येथील काचीगुडी रेल्वे स्थानकातील तिरंगी रोषणाई.