IND vs PAK : अचानक डाव पलटला! आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

IND vs PAK : अचानक डाव पलटला! आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Sep 03, 2023, 00:03 AM IST

IND vs PAK, Hockey Team: एकीकडे क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे धुतला गेला, तर दुसरीकडे भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा धुळ चारली आहे. त्यामुळे आता हॉकी संघाचं कौतुक होताना दिसत आहे. 

1/7

पाकिस्तानचा धुव्वा उडवला

हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. हॉकी 5S आशिया चषकात भारताने पाकिस्तानवर 6-4 असा विजय मिळवला आहे. 

2/7

हॉकी 5S फॉरमॅट

अंतिम फेरीत भारताकडून मनदीप मोर (कर्णधार), सूरज करकेरा, जुगराज सिंग, मनिंदर सिंग आणि पवन राजभर यांनी मैदानात उतरले होते. हॉकी 5S फॉरमॅटमध्ये दोन्ही संघाचे 5 प्लेयर मैदानात उतरतात.

3/7

भारतीय खेळाडूंनी दम दाखवला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अधिक रोमांचक झाला. पाकिस्तानचा संघ पहिल्या हाफनंतर 3-2 असा आघाडीवर होता. पण भारतीय खेळाडूंनी अखेरच्या काही मिनिटांमध्ये दम दाखवला.

4/7

निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये

दुसऱ्या हाफमध्ये टीम इंडियाने आपला खेळ उंचावला आणि सामना 4-4 च्या स्थितीत आणला. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला.

5/7

पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी

पॅनेल्टी शूटआऊटमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. त्यांना एकही गोल करता आला नाही.

6/7

पॅनेल्टी शूटआऊट

पॅनेल्टी शूटआऊटमध्ये भारताने दोन अचूक गोल करत 2-0 ने पॅनेल्टी शूटआऊट जिंकला. मनदीर सिंह याने विजयात मोठी भूमिका बजावली.

7/7

5S हॉकी विश्वचषक 2024 साठी पात्र

दरम्यान, याआधी भारताने 35 गोल करत जपानी संघाचा पराभव केला होता. आता भारतीय हॉकी संघ 5S हॉकी विश्वचषक 2024 साठी पात्र ठरला आहे.