देशातील सर्वात लांब महामार्ग, मुंबई ते दिल्ली 12 तासांत... असा आहे Delhi Mumbai Expressway

Delhi Mumbai Expressway : रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन होणार आहे. त्यामुळे दिल्ली ते जयपूर प्रवासाचा वेळ 5 तासांचा प्रवास 3.5 तासांपर्यंत कमी होणार आहे.

Feb 11, 2023, 18:51 PM IST
1/6

delhi mumbai expressway pm modi

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दिल्ली-दौसा-लालसोट हा मार्ग पंतप्रधान मोदी उद्या राष्ट्राला समर्पित करतील. 

2/6

delhi dausa lalsot expressway

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा 246 किमीचा दिल्ली-दौसा-लालसोट हा रस्ता 12,150 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. दिल्ली-दौसा-लालसोट हा रस्ता सुरू झाल्यामुळे, दिल्ली ते जयपूर प्रवासाचा वेळ 5 तासांचा प्रवास 3.5 तासांपर्यंत कमी होणार आहे.

3/6

delhi mumbai

दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे असेल आणि ज्याची लांबी 1,386 किमी असणार आहे. यामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यानचे अंतर 1,424 किमी वरून 1,242 किमी पर्यंत कमी होईल आणि प्रवासाचा वेळ 24 तासांवरून 12 तासांवर येणार आहे.

4/6

delhi mumbai expressway nitin gadkari

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या एक्सप्रेस वेचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे रात्री खूप सुंदर दिसतो.

5/6

delhi mumbai expressway state

हा एक्सप्रेस वे  दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जाणार आहे. यासोबत कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत या प्रमुख शहरांना जोडणार आहे.

6/6

delhi mumbai expressway MMLPs

एक्सप्रेसवे 93 PM गति शक्ती आर्थिक नोड्स, 13 बंदरे, 8 प्रमुख विमानतळ आणि 8 मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क (MMLPs) तसेच जेवार विमानतळ, नवी मुंबई विमानतळ आणि JNPT पोर्ट यांसारख्या आगामी ग्रीनफिल्ड प्रकल्पांना जोडला जाणार आहे.