ना जास्त थंडी, ना गरमी! एप्रिलमध्ये फक्त 5 हजारात फिरण्यासारखी ठिकाणे

 तुमचे बजेट खूप कमी असेल तरी काळजी करु नका. कारण आम्ही तुम्हाला परवडतील आणि आवडतील अशा स्थळांबद्दल सांगणार आहोत. 

| Apr 19, 2024, 15:12 PM IST

Places to Visit in April: तुमचे बजेट खूप कमी असेल तरी काळजी करु नका. कारण आम्ही तुम्हाला परवडतील आणि आवडतील अशा स्थळांबद्दल सांगणार आहोत. 

1/11

ना जास्त थंडी, ना गरमी! एप्रिलमध्ये फक्त 5 हजारात फिरण्यासारखी ठिकाणे

India Places to visit in april 2024 Travelling Tips Marathi News

Places to Visit in April: एप्रिल महिन्यापासून तापमान वाढायला सुरुवात होते. उन्हाळ्याला सुरुवात झालेली असते. अनेक शहरांतील तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. या काळात मुलांच्या शाळांना सुट्टीदेखील पडलेली असते. अशावेळी कमी खर्चात ट्रीप प्लान केल्या जातात. 

2/11

फारशी थंडी किंवा खूप दमट उष्णता नसते

India Places to visit in april 2024 Travelling Tips Marathi News

एप्रिल महिन्यात फारशी थंडी किंवा खूप दमट उष्णता नसते. यामुळे प्रवास करताना घाम येणे आणि डिहायड्रेशनचा त्रास सहन करावा लागत नाही.काहींना जास्त थंड ठिकाणी जाणे आरोग्याच्या दृष्टीने आवडत नाही. तर उष्ण ठिकाणेही टाळली जातात. अशावेळी कुठे जायचं? हा प्रश्न तुम्हलादेखील पडलाय का?

3/11

5 हजार रुपयांच्या बजेटमध्ये

India Places to visit in april 2024 Travelling Tips Marathi News

तुमचे बजेट खूप कमी असेल तरी काळजी करु नका. कारण आम्ही तुम्हाला परवडतील आणि आवडतील अशा स्थळांबद्दल सांगणार आहोत. अवघ्या 5 हजार रुपयांच्या बजेटमध्ये होतील, अशी काही ठिकाणे जाणून घेऊया. 

4/11

पचमढी

India Places to visit in april 2024 Travelling Tips Marathi News

पचमढी हे मध्य प्रदेशातील एकमेव हिल स्टेशन आहे. पचमढीच्या शिखरापासून दूर असलेल्या सातपुडा टेकड्यांवर चहुबाजून सर्वत्र हिरवळ दिसते. पचमढीच्या लेण्यांमध्ये तुम्हाला भव्य नक्षीकाम आणि धबधबे पाहता येईल. यासाठी एप्रिल महिना योग्य आहे. येथे तुम्हाला हायकिंग आणि ट्रेकिंगचाही आनंद घेता येऊ शकेल.

5/11

कमी खर्चात राहणे- फिरणे

India Places to visit in april 2024 Travelling Tips Marathi News

पचमढीला जाण्यासाठी पिपरिया हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. भोपाळ किंवा जबलपूर हे विमानाने जवळचे विमानतळ आहेत. पचमढीपर्यंत रस्ते मार्गाने जाताना नैसर्गिक दृश्यांचा आनंद लुटता येतो. इथे फिरायला आणि राहायला जास्त खर्च येणार नाही.

6/11

धरमशाला

India Places to visit in april 2024 Travelling Tips Marathi News

धरमशाला हे ठिकाणं हिमाचलच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेले आहे. एप्रिलमध्ये फिरायचा प्लान करत असाल तर हे सर्वोत्तम ठिकाण आहे. धरमशाला या ठिकाणाला मिनी तिबेट असेही म्हणतात. तिबेटचे ध्वज इकडे तिकडे फडकत राहतात. 

7/11

हॉटेलचे भाडेही कमी

India Places to visit in april 2024 Travelling Tips Marathi News

गजबजलेली बाजारपेठ, संग्रहालये आणि मठ पाहण्यासाठी तुम्ही पर्वतांच्या मधोमध असलेल्या या आरामदायी ठिकाणी भेट देऊ शकता. धरमशाला येथे जाण्यासाठी बस दिल्ली, शिमला आणि डेहराडून येथून सहज उपलब्ध आहे. जी बजेटमध्येही आहे. येथे हॉटेलचे भाडेही फारसे नसते.

8/11

मसुरी

India Places to visit in april 2024 Travelling Tips Marathi News

उत्तराखंडच्या मसुरीला 'पहाडांची राणी' असेही म्हणतात. एप्रिलमध्ये मसुरीमध्ये थंड वारे वाहतात. दिवसा स्कूटीवर मसुरीच्या रस्त्यांवर फिरत असताना, सोनेरी सूर्यप्रकाशातील थंड वाऱ्याची झुळूक एक अद्भुत प्रवास घडवून आणते. येथे तुम्ही लाल टिब्बा, केम्पटी फॉल, कंपनी गार्डन, दलाई हिल्सला भेट देऊ शकता.

9/11

मसुरीपर्यंत बस आणि टॅक्सी

India Places to visit in april 2024 Travelling Tips Marathi News

याशिवाय धनौल्टी आणि सुरकंडा माता मंदिरातही जाता येते. साहसासाठी, तुम्हाला बजेटमध्ये अनेक खेळांचा आनंद घेता येईल. या हिल स्टेशनमध्ये राहण्याचा, प्रवास आणि खाण्याचा खर्च 5000 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकतो. डेहराडून किंवा ऋषिकेश ते मसुरीपर्यंत बस आणि टॅक्सी सहज उपलब्ध आहेत.

10/11

माउंट अबू

India Places to visit in april 2024 Travelling Tips Marathi News

राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन माउंट अबूला भेट देण्यासाठी एप्रिल महिना देखील चांगला आहे. माउंट अबूच्या आजूबाजूला घनदाट जंगले आहेत आणि ग्रॅनाइटच्या शिखराने वेढलेली आहेत. येथे जैन आणि हिंदूंची अनेक पवित्र आणि प्राचीन मंदिरे आहेत. कडक उन्हापासून आणि उष्णतेपासून दूर, माउंट अबू हे थंड आणि निसर्गाच्या जवळ असलेले शहर आहे, तिथे पोहोचण्यासाठी अबू रोड हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. रस्त्यानेही येथे जाता येते.

11/11

इतर ठिकाणे

India Places to visit in april 2024 Travelling Tips Marathi News

तुमचे बजेट यापेक्षा जास्त असेल तर एप्रिल महिन्यात तुम्ही दार्जिलिंग, रावंगला, चेरापुंजी, गुलमर्ग, उटी आणि तवांगला भेट देऊ शकता. एप्रिल महिन्यात फिरायचा प्लान करण्यासाठी नैनिताल आणि उटी सर्वोत्तम पर्याय आहेत.