कर्तव्यपथावर शिवशाही अवतरली, एका क्लिकवर पाहा 16 राज्यांच्या चित्ररथाची झलक

Republic Day Parade 2024 : देशभरात आज 75व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे.. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर कर्तव्यपथावर भारताच्या संस्कृतीचं आणि सामर्थ्याचं दर्शन घडलं.. यावर्षी पहिल्यांदा महिलांच्या पथकानं परेडची सुरुवात झाली.. त्यांनंतर भारतीय सैन्याच्या तिनही दलाच्या जवानांनी कर्तव्यपथावर शानदार संचलन केलं.

| Jan 26, 2024, 15:21 PM IST
1/16

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर शिवशाही अवतरली. या कार्यक्रमात सामिल होणा-या महाराष्ट्राच्या चित्ररथातून शिवराज्याभिषेकाचा सोहळा दाखवण्यात आला. 'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान - छत्रपती शिवाजी महाराज' या विषयावर हा चित्ररथ साकारण्यात आलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या देखाव्यावरील संपूर्ण शिल्प यवतमाळ जिल्ह्यात तयार करण्यात आलीत.  

2/16

उत्तर प्रदेशचा चित्ररथ 'अयोध्या:विकसित भारत, समृद्ध विरासत' या संकल्पनेवर आधारीत होता.  प्रभू रामाचं जन्मस्थान असल्याने उत्तर प्रदेश ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले क्षेत्र आहे. याशिवाय आरआरटीएसचे साहिबाबाद स्थानक आणि  नमो भारत ट्रेनचाही यात समावेश करण्यात आला होता. 

3/16

अरुणाचल प्रदेशचा चित्ररथ बुगुन कम्युनिटी रिझर्व्हवर केंद्रित होता. 

4/16

आंध्र प्रदेशचा चित्ररथ शालेय शिक्षणात आमुलाग्र बदल आणि विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे या संकल्पनेवर आधारीत आहे. 

5/16

छत्तीसगड राज्याचा चित्ररथ बस्तरच्या आदिवासी लोकांच्या मुरिया दरबारशी संबंधित होता. 

6/16

हरियाणा राज्याचा चित्ररथ मेरा परिवार-मेरी पहचान या संकल्पनेवर आधारीत होता. हरयाणा सरकारचा ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरते.

7/16

मध्य प्रदेशचा चित्ररथ स्वावलंबी महिलांच्या विकास या संकल्पनेवर आधारीत होता. मध्य प्रदेशने कल्याणकारी योजनांद्वारे महिलांना थेट विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात उल्लेखनीय यश मिळविलं आहे.

8/16

मणिपूरचा चित्ररथ थंबल गी लांग्ला-लोट्स थ्रेड्स या विषयावर होता. मणिपूरमधलं मदर्स मार्केट हे 500 वर्ष जूनं आहे. स्त्री शक्तीचं हे एक उत्तम उदाहरण आहे. 

9/16

ओडिशा राज्याचा चित्ररथ विकसित भारतातील महिला सशक्तिकरणावर आधारीत होता. 

10/16

राजस्थान राज्याच्या चित्ररथात पथारो म्हारे देश ही संकल्पना दाखवण्यात आली होती.   

11/16

लडाखच्या चित्ररथासाठी रोजगाराच्या माध्यमातून महिलांचं सशक्तिकरण हा विषय घेण्यता आला होता. 

12/16

तामिळनाडू सरकारने 10 व्या शतकातील चोल युगातील संदर्भ चित्ररथासाठी निवडला होता. 

13/16

गुजरातमधल्या कच्छमधलं धोरडो या छोट्या गावाने आपला सांस्कृतिक वारसा जपला आहे. या संस्कृतीवरच चित्ररथाची संक्लपना साकारण्यात आली होती. 

14/16

मेघालयचा चित्ररथ प्रगतीशील पर्यटनावर आधारित आहे. चेरीच्या फुलांचा मनमोहक देखावा साकारण्यात आला होता. 

15/16

झारखंडचा चित्ररथ टसर सिल्क या विषयावर केंद्रीत होता. 

16/16

तेलंगणाची झांकी तळागाळातील लोकशाही: तेलंगणाच्या स्वातंत्र्य चळवळीचे योद्धे आणि त्यांची परंपरा या थीमवर केंद्रित होती