India Population : भारताने चीनचा रेकॉर्ड मोडला

India Population :  संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाखांवर गेली आहे. तर, चीनची लोकसंख्या 142 कोटी 57 लाख आहे. 

Apr 19, 2023, 21:40 PM IST

India Population 2023 :  लोकसंख्येत भारत जगात पहिल्या नंबरवर गेला आहे. भारतानं लोकसंख्येत आता चीनला मागे टाकले आहे. ही आकडेवारी दुस-या तिस-या कुणाची नसून यूएन म्हणजेच संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केली आहे. भारताची लोकसंख्या चीनपेक्षा तब्बल 29 लाखांनी जास्त आहे. 1950 पासून, ज्या वर्षी UN ने लोकसंख्येचा डेटा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. 

1/6

भारताची लोकसंख्या 2050 पर्यंत 1.668 अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 

2/6

भारतातील 25 टक्के लोकसंख्या 0-14 वयोगटातील आहे, 18 टक्के 10 ते 19 वयोगटातील आहे, 26 टक्के 10 ते 24 वर्षे वयोगटातील आहे, 68 टक्के 15 ते 64 वर्षे वयोगटातील आहेत. 

3/6

अलिकडच्या वर्षांत आयुर्मानात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे लोकसख्येचा आकडा फुगला आहे. 

4/6

UN च्या आकडेवारीनुसार, 2023 च्या मध्यापर्यंत जागतिक लोकसंख्या 8.045 अब्जांवर पोहोचेल.

5/6

 1960 नंतर प्रथमच चीनमधील लोकांची संख्या कमी झाली आहे.

6/6

UN च्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या एक अब्जाहून अधिक लोकांनी वाढली आहे.