927 पूल, 38 बोगदे आणि आयफल टॉवरपेक्षा उंच रेल्वे ब्रिजवरुन जाणारी ट्रेन... भारतातील 'या' मार्गासाठी लागली 22 वर्ष

Railway Highest Bridge : भारतीय रेल्वेचं जाळं देशातील काना-कोपऱ्यात पसरलं आहे. यात आता आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे. रेल्वेने 272 किमीचा रेल्वे मार्ग बनवला असून या मार्गावर तब्बल 119 किमी लाब बोगदा आहे. तर 927 रेल्वे पूल आहेत.   

| Oct 24, 2024, 14:16 PM IST
1/8

927 पूल, 38 बोगदे आणि आयफल टॉवरपेक्षा उंच रेल्वे ब्रिजवरुन जाणारी ट्रेन... भारतातील 'या' मार्गासाठी लागली 22 वर्ष

2/8

भारतीय रेल्वेचं जाळं देशातील काना-कोपऱ्यात पसरलं आहे. अगदी शहरी भागापासून दुर्गम भागाला रेल्वेने जोडलं गेलं आहे. यात आता आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे. या मार्गावरुन प्रवास करताना तु्म्हााल बर्फाने आच्छादलेले डोंगर तर कुठे खोल दऱ्या पाहायला मिळणार आहेत. ही रेल्वे उंच डोंगरातील बोगद्यातूनही प्रवास करणार आहे. या रेल्वे मार्गावर 119 किलोमीटरचा लांब बोगदा आहे तर 927 पूलही आहेत. रेल्वेचा हा प्रवास हॉलिवूडमधल्या एका चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या दृष्यांपेक्षा कमी नाही. 

3/8

जगातील सर्वात उंच असलेला हा रेल्वे मार्ग आहे जम्मू काश्मिरमध्ये. ऊधमपूर-श्रीनगर-बारामुल्लाला जोडणाऱ्या या मार्गावर जगातील सर्वात उंच चिनाब ब्रिज आहे. यावर रेल्वेची चाचणीही यशस्वी झाली आहे. 15 ऑगस्टला या मार्गावरुन रेल्वेची चाचणी घेण्यात आली होती.   

4/8

भारतीय रेल्वेने 272 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग तयार करुन देशातील दुर्गम भागाला मुख्य प्रवाहात आणलं आहे. 272 किमी लांब असलेल्या या रेल्वे मार्गावर 119 किमीचा बोगदा आहे. याशिवाय 927 रेल्वे पूल आणि 38 लहान मोठे बोगदे आहेत. जम्मूला श्रीनगरशी रेल्वेने जोडण्याचा हा प्रकल्प प्रचंड आव्हानात्मक होता. 

5/8

या रेल्वे मार्गाचं काम 2002 मध्ये सुरु करण्यात आलं आणि आता 2024 च्या अखेरपर्यंत या मार्गावर ट्रेन चालवण्याची योजना आहे. म्हणजे हा रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तब्बल 22 वर्ष लागली. रेल्वे मार्ग बनवण्यासाठी 927 पूल बनवावे लागले, त्यांची लांबी जवळपास 13 किलोमीटर इतकी आहे. यापैकी चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. 

6/8

आयफेल टॉवपपेक्षाकीह उंच असलेल्या चिनाब पूलची उंजी 359 मीटर आहे. तर लांबी 1,315 मीटर आहे. या रेल्वे पूलाचं आयुष्य तब्बल 120 वर्ष आहे. 8 रिक्टर स्केल भूकंप सहन करण्याची ताकद या पूलात आहे. इतकच नाही तर 40 किलोचा शक्तीशाली स्फोट झाला तरी पूल हलणार नाही.   

7/8

इतक्या उंचीवर असतानाही हा रेल्वे पूल 220 किमी प्रती तास वेगाने आलेलं वादळ झेलू शकतो. हा रेल्वे पूल बनवण्यासाठी तब्बल 35000 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमेपासून हा पूल केवळ 64 किमी दूर आहे. आता लवकरच या पुलावरुन रेल्वे प्रवास सुरु होणार आहे.   

8/8

272 किमीच्या या रेल्वे मार्गावर 38 बोगदे आहेत. या बोगदाची एकूण लांबी 119 किमी इतकी आहे. यापैकी सर्वात मोठा बोगदा हा टी-49 आहे. याची लांबी 12.75 किमी इतकी आहे. हा देशातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा आहे. या मार्गावरुन जम्मूहून श्रीनगरला केवळ 3.5 तासात पोहोचता येणार आहे.