सहा महिने संघातून बाहेर असणाऱ्या 'या' खेळाडूला गौतम गंभीर करणार टीम इंडियाचा कॅप्टन

India Vs Sri lanka Series : झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्या करणार आहे. त्यासाठी आता बीसीसीआयने टीम इंडियाचं शेड्यूल (Ind vs SL series Schedule) जाहीर केलंय. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-ट्वेंटी आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. 

| Jul 12, 2024, 11:36 AM IST
1/5

कॅप्टन कोण?

बीसीसीआयने टीम इंडियाचं शेड्यूल जाहीर केलं असलं तरी अद्याप टी-ट्वेंटी आणि वनडेसाठी कॅप्टन कोण असेल? यावर कोणतीही माहिती समोर आली नाही. 

2/5

गौतम गंभीर

श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियाची जबाबदारी सांभाळणार आहे. अशातच आता कॅप्टन म्हणून गौतम गंभीर एका खेळाडूवर डाव लावण्याची शक्यता आहे.

3/5

केएल राहुल

श्रीलंका दौऱ्यात गेल्या सहा महिन्यापासून संघातून बाहेर असणाऱ्या केएल राहुल याला कॅप्टन्सी सोपवण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याला आराम दिला जाऊ शकतो.

4/5

टीम इंडियाच्या टी-ट्वेंटी सामन्याचं वेळापत्रक

26 जुलै – पहिला टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले 27 जुलै – दुसरा टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले 29 जुलै – तिसरा टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले

5/5

टीम इंडियाच्या वनडे सामन्याचं वेळापत्रक

1 ऑगस्ट – पहिली वनडे, कोलंबो 4 ऑगस्ट – दुसरी वनडे, कोलंबो 7 ऑगस्ट – तिसरी वनडे, कोलंबो