अशी पार पडली भारतीय वायुसेनेच्या नव्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड'

Jun 23, 2020, 13:41 PM IST
1/9

अशी पार पडली भारतीय वायुसेनेच्या नव्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड'

२० जून २०२० या दिवशी भारतीय वायुदलाच्या सेवेत रुजू होण्यासाठी आणखी एक युवा अधिकाऱ्यांची तुकडी सज्ज झाली. 

2/9

अशी पार पडली भारतीय वायुसेनेच्या नव्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड'

वायुदलाच्याच अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन या गौरवशाली क्षणांची काही छायाचित्र सर्वांच्या भेटीला आणण्यात आली. 

3/9

अशी पार पडली भारतीय वायुसेनेच्या नव्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड'

डूंडीगल येथे असणाऱ्या वायुदल अकादमीमध्ये आयोजित एका भव्य कंबाईन्ड ग्रॅज्युएशन परेड समारंभात वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया यांच्या हस्ते १२३ फ्लाईट कॅडेटना भारतीय वायुदलातील कमिशन बहाल करण्यात आलं. 

4/9

अशी पार पडली भारतीय वायुसेनेच्या नव्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड'

भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या ११ अधिकाऱ्यांनाही याच सोहळ्यात प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल पुढील जबाबदारी सोपवत त्यांचा गौरव करण्यात आला. 

5/9

अशी पार पडली भारतीय वायुसेनेच्या नव्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड'

अतिशय अभिमानास्पद अशा या क्षणी व्हिएतनाम पीपल्स एअर डिफेंस एँड एफर फोर्सच्या दोन कॅडेटनाही विंग्स प्रदान करण्यात आले. 

6/9

अशी पार पडली भारतीय वायुसेनेच्या नव्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड'

या क्षणी उपस्थितांना संबोधित करण्यापूर्वी सुरुवातीलाच गलवान खोऱ्याच देशाच्या संरक्षणारंथ वीरमरण आलेल्या शहीदांना श्रद्धआंजली वाहण्यात आली.   

7/9

अशी पार पडली भारतीय वायुसेनेच्या नव्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड'

सद्यस्थिती पाहता संरक्षण दलातील प्रत्येकालात सजग आणि सतर्क राहणं आवश्यक असल्याचा महत्त्वाच संदेश वायुदल प्रमुखांनी या क्षणी उत्तीर्ण होणाऱ्या फ्लाईंग ऑफिसर्सना दिला. 

8/9

अशी पार पडली भारतीय वायुसेनेच्या नव्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड'

#LAC वर होणाऱ्या हालचाली ही तर एक झलक झाली. पण, अगदी कमी वेळातच सुरक्षा दलांना कशा प्रकारे मोठ्या कारवाईसाठी सज्ज व्हावं लागतं याचीच प्रचिती यातून आली. 

9/9

अशी पार पडली भारतीय वायुसेनेच्या नव्या तुकडीची 'पासिंग आऊट परेड'

वायुदल प्रमुखांनी प्रत्येक अधिकाऱ्याला त्यांच्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली. (सर्व छायाचित्रे- भारतीय वायुदल)   

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x