पतीसह अभिनेत्रीचा योगाभ्यास; फिटनेस पाहून व्हाल थक्क

Jun 23, 2020, 12:01 PM IST
1/5

अभिनेत्री आश्का गोरडिया हिनं काही दिवसांपासून छोट्या पडद्यापासून अर्थात मालिका विश्वापासून दूर राहणं पसंत केलं असलं तरीही चाहत्यांपासून मात्र ती अजिबातच दुरावलेली नाही. 

2/5

मालिका विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या या अभिनेत्रीनं लग्नानंतर कलाविश्वापासून काहीसं दूर राहणं पसंत केलं. चाहत्यांच्या वर्तुळात तिचा वावर मात्र कायम राहिला. याला निमित्त ठरलं ते म्हणजे तिची योगसाधना आणि योगविद्येवर असणारं प्रभुत्त्व. 

3/5

आश्का आणि तिचा पती ब्रेंट गोबल हे दोघंही योगविद्येचे अभ्यासक असून, अनेकदा ही जोडी वेगळ्याच अंदाजात चाहत्यांना योगाच्या माध्यमातून कपल गोल्स देताना दिसत असते. 

4/5

सध्या सोशल मीडियावर या जोडीचे समुद्र किनाऱ्यावरील योगसाधनेचे फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये त्या दोघांचा फिटनेस पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. 

5/5

पतीसह योगविद्येचा अभ्यास करतानाची अशी पोस्ट करण्याची आश्काची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा तिनं कायमच तिचं हे कौशल्य सर्वांपुढे आणलं आहे.