'तुम्हाला वाटत असेल की फार मॅच्यूअर...', रवी शास्त्रीने गौतम गंभीरबद्दल मांडलं स्पष्ट मत

गौतम गंभीरने (Gautam Gambhir) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा पदभार स्विकारल्यानंतर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shahstri) यांनी यावर मत मांडलं आहे.   

Jul 26, 2024, 18:56 PM IST

गौतम गंभीरने (Gautam Gambhir) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा पदभार स्विकारल्यानंतर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shahstri) यांनी यावर मत मांडलं आहे. 

 

1/8

गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकदी नियुक्ती झाल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. याचं कारण रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांनी त्याच्यासाठी यशाची एक उंची गाठून ठेवली आहे.   

2/8

रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक असताना भारतीय संघ एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाही. पण विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी एक जबरदस्त संघ तयार केला. हा संघ सलग पाच वर्षं कसोटीत पहिल्या क्रमांकावर होता.   

3/8

यामुळेच गौतम गंभीरवर क्रिकेट रसिकांच्या अपेक्षांचं ओझं आहे. त्यातच आता रवी शास्त्री यांनी गौतम गंभीरच्या नियुक्तीवर भाष्य केलं आहे. त्यांनी गौतम गंभीर अत्यंत योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं आहे.   

4/8

"तो समकालीन आहे, त्याचा नुकताच आयपीएलचा हंगाम चांगला गेला आहे. मला वाटतं की त्याचं वय सध्या योग्य आहे, तो तरुण आहे. तो नवीन कल्पना घेऊन येईल. आयपीएलमधील अनेक संघांचा भाग असल्याने तो बहुतेक खेळाडूंना ओळखतो. त्यामुळे हे थोडं फ्रेश कऱणारं आहे,” असं शास्त्री आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये म्हणाले.  

5/8

"तसंच त्याला इतर विनाकारण होणाऱ्या गोष्टी आवडत नाहीत. त्याच्याकडे त्याच्याही कल्पना असतील. महत्त्वाचं म्हणजे त्याला एक मॅच्यूअर संघ मिळाला आहे. त्याच्याकडे एक सेटल टीम आहे," असंही रवी शास्त्री म्हणाले.   

6/8

पुढे ते म्हणाले की, "पण जरी तुम्हाला वाटत असलं की तुम्ही मॅच्यूअर आहात तरी एखाद्याच्या कल्पनेमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे औत्सुक्याचं असलं. प्रशिक्षक असताना खेळाडूंचं व्यवस्थापन जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते कसं होतं हे पाहावं लागेल. मला वाटतं त्याच्याकडे प्रशिक्षकपदासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. त्याच्याकडे अनुभवही आहे".  

7/8

"आपल्या खेळाडूंना लवकरात लवकर समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांची जमेची बाजू, माणूस म्हणून कसे आहेत? त्यांचा स्वभाव कसा आहे? त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे? एका माणसाला समजून घेण्यासाठी अनेक गोष्टी गरजेच्या असतात," असा सल्लाही त्यांनी दिला.   

8/8

"मला वाटते की हे त्याचे सर्वात महत्वाचे कार्य असेल. पण तो तरुण असल्याने त्याला फार समस्या येणार नाही असं मला वाटतं. त्याने या लोकांना बाहेरून पाहिले आहे, त्याने केकेआर आणि लखनौसाठी खेळलेल्या अनेक लोकांशी सामना केला आहे," असंही रवी शास्त्री म्हणाले.