World Cup आधी राहुल द्रविडची गच्छंती? 'हे' पाच माजी भारतीय खेळाडू Head Coach होण्याच्या स्पर्धेत
2023 एकदिवसीय वर्ल्डकप (ODI World Cup 2023) संपतानाच राहुल द्रविडचा (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदाचा (Head Coach) करारही संपुष्टात येत आहे. राहुल द्रविडनंतर प्रशिक्षकपदासाठी कोणाला संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. दरम्यान सध्या तरी पाच उमेदवार चर्चेत आहेत.
1/7
2/7
3/7
आशिष नेहरा
इंडियन प्रीमियर लीगमधून आशिष नेहराने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. त्याने गुजरातला एकदा जेतेपद मिळवून दिलं असून, दुसऱ्या हंगामात थेट फायनलमध्ये धडक मारली. आयपीएलमध्ये नेहरा मैदानाबाहेर प्रचंड आक्रमक दिसत होता. हार्दिक पांड्यालाही नेहराची साथ आवडते. त्यामुळे भारतीय संघाचा पुढील प्रशिक्षक होण्याची क्षमता त्याच्यात आहे.
4/7
झहीर खान
झहीर खान हा मुंबई इंडियन्समधील घडामोडींवर लक्ष ठेवणारा ग्लोबल हेड आहे. त्याला याचा उत्तम मोबदलाही मिळत असेल. पण बीसीसीआयने झहीरच्या अनुभवाचा उपयोग करून घेतला पाहिजे. झहीरने गेल्या काही वर्षांत आयपीएलमध्ये मुंबईच्या यशात मोठी भूमिका बजावली आहे. कोणत्याही कर्णधारासाठी झहीर खान एक चांगला पर्याय आहे. झहीर शांत आणि संयमी असून विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासह संघातील जवळपास सर्व वरिष्ठ खेळाडूंशी त्याचे चांगले संबंध आहेत.
5/7
वीरेंद्र सेहवाग
बीसीसआय भारतीय संघाच्या माजी खेळाडूकडेच प्रशिक्षकपद देण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरेंद्र सेहवाग हादेखील एका चांगला पर्याय असू शकते. सेहवागने आपल्या फलंदाजीने कसोटी संघातील फलंदाजीचं रुपडंच बदललं होतं. सध्या क्रिकेटचं जग बदलत असून, सेहवाग हा भारतीय संघासाठी अत्यंत योग्य असल्याचं दिसत आहे. गरज पडल्यास सेहवागला फक्त टी-20 संघाचं प्रशिक्षकपद दिलं जाईल.
6/7