Shirdi Package : शिर्डीला जाण्यासाठी IRCTC चं खास पॅकेज; खर्च किती येणार पाहा

IRCTC Shirdi Tour Package : आठवडी सुट्टीला एखादी जोड सुट्टी धरून तुम्ही या पॅकेजमुळं शिर्डी गाठू शकता. साईबाबांच्या दर्शनासाठी जाण्यास तुम्हीही उत्सुक आहात का? 

Feb 21, 2024, 15:26 PM IST

IRCTC Shirdi Tour Package : कुटुंबासमवेत एखाद्या धार्मिक यात्रेवर जाण्याचा बेत तुम्हीही आखताय का? मग, भारतीय रेल्वे विभागाच्या आयआरसीटीसीकडून एक कमाल पॅकेज तुमच्यासाठी तयार करण्यात आलं आहे. 

1/7

Shirdi Tour Package

indian railway news irctc introduced tour package for shirdi see details latest updates

IRCTC Shirdi Tour Package : महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामधील शिर्डी येथे असणाऱ्या साईबाबा मंदिरात येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. याशिवाय साईबाबांचा वावर असणाऱ्या या शिर्डीनगरीला मनसोक्त न्याहाळू शकता.   

2/7

पॅकेज कोड

indian railway news irctc introduced tour package for shirdi see details latest updates

रेल्वेच्या वतीनं SHIRDI RAIL TOUR PACKAGE EX BENGALURU या पॅकेजमार्फत तुम्हाला ही संधी देण्यात येत आहे. SBR001 असा या पॅकेजचा कोड आहे.   

3/7

3 रात्री, 4 दिवस

indian railway news irctc introduced tour package for shirdi see details latest updates

3 रात्री, 4 दिवसांसाठी तुम्ही या पॅकेजमार्फत शिर्डीत येऊ शकता. 25 फेब्रुवारीपासून या पॅकेजची सुरुवात होणार असून, नावाप्रमाणं त्याचा प्रारंभ बंगळुरूतून होणार आहे. 

4/7

रेल्वे पॅकेज

indian railway news irctc introduced tour package for shirdi see details latest updates

आयआरसीटीसीचं हे रेल्वे पॅकेज असला तरीही स्थानिक प्रेक्षणीय स्थळी तुम्हाला कॅबनं फिरवण्यात येणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. 

5/7

एकूण सुविधा

indian railway news irctc introduced tour package for shirdi see details latest updates

प्रवासादरम्यान ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण या साऱ्याची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय तुमच्या मुक्कामाची व्यवस्थाही आयआरसीटीसीकडून करण्यात येणार आहे.   

6/7

खर्च

indian railway news irctc introduced tour package for shirdi see details latest updates

राहिला मुद्दा खर्चाचा, तर तुम्ही एकट्यानं प्रवास करत असल्यास कंफर्ट क्लास (3AC) मध्ये 10350 रुपये, स्टँडर्ड (Sleeper) मध्ये 7890 रुपये, दोघंजण एकत्र प्रवास करत असल्यास त्यांना 3AC मध्ये 8090 रुपये आणि स्टँडर्ड कॅटेगरीमध्ये 5630 रुपये खर्च येईल. 

7/7

तिघांचा एकत्र प्रवास

indian railway news irctc introduced tour package for shirdi see details latest updates

तुम्ही तीन व्यक्ती एकत्र प्रवास करत असल्यास कंफर्ट क्लास (3AC) मध्ये माणसी 7690 आणि स्टँडर्ड Sleeper मध्ये माणसी 5230 रुपये इतका खर्च येईल.