Lockdown : कोणीही भुकेलं राहणार नाही, रोज वाटले जात आहेत ५ हजार जेवणाचे डबे

चीनच्या वुहान शहरात उदयास आलेलं हे धोकादायक वादळ अद्यापही शमलेलं नाही. 

Mar 28, 2020, 18:57 PM IST

कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे संपूर्ण जगातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे .  विशेष करून मजुरीवर काम कारणारी कामगार आणि भिकारी यांचे हाल मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तर त्यांच्या मदतीसाठी अनेक उद्योजक आणि सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. 

1/5

कोरोना व्हायरसमुळे  सामान्य जनतेचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या आणीबाणीच्या काळात हातवर पोट असणाऱ्यांचे मात्र प्रचंड हाल होताना दिसत आहेत. त्यांना दोन वेळचं अन्न मिळणं देखील  कठीण झालं आहे. आग्रामध्ये अशा लोकांसाठी पाच हजार जेवणाचे डबे तयार करण्यात येत आहेत. 

2/5

आग्राच्या एका व्यवसायिकाने गरिब आणि कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. 

3/5

गरिब आणि कामगारांमध्ये वाटण्यात आलेल्या जेवणाच्या डब्यांमध्ये पुलाव भात आणि भाजी होती. सोशल डिस्टंसिंगचे महत्त्व लक्षात घेत नागरिकांमध्ये जेवणाचं वाटप करण्यात आलं. 

4/5

शू एक्पोर्टर पूरन डावरने आणीबाणीच्या काळात अन्न वाटण्याचा  संकल्प हाती घेतला आहे. शिवाय आग्रा प्रशासनाने देखील त्यांची मदत केली.   

5/5

संपूर्ण जगाला हालवून सोडलेल्या कोरोना विषाणूने आता पर्यंत हजारो नागरिकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आता अचानक अलेलं हे संकट कधी दूर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.