'ही' आहेत भारतातील 5 विचित्र रेल्वे स्टेशन, जाणून घ्या रंजक माहिती

भारतात अनेक विचित्र रेल्वे स्टेशन आहेत. आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Jul 27, 2022, 18:06 PM IST

Indian Railways :  भारत हा विविधतेने नटललेला देश आहे. भारतात 7000 हून अधिक रेल्वे स्थानके आहे. तर भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वेसेवा आहे. भारतात अशी अनेक रेल्वे स्थानकं आहेत, ज्यांची स्व:ताची वेगळी ओळख आहे. तुम्हाला माहिती आहे का, भारतात असे अनेक विचित्र पण रेल्वे स्थानके आहेत, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अनेकांना अशा ठिकाणांबद्दल जाणून घ्यायला आवडतं. तुम्हाला माहिती आहे. भारतात अनेक विचित्र रेल्वे स्टेशन आहेत. आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

 

1/5

अटाली

तुम्हाला जर अटारी रेल्वे स्टेशनवरून ट्रेन पकडायची असेल किंवा उतरायचे असेल तर तुमच्याकडे व्हिसा असणे गरजेचं आहे. अटाली हे रेल्वे स्टेशन भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील अमृतसरमध्ये आहे. या स्टेशनवर व्हिसाशिवाय जाण्यास सक्त मनाई आहे. या स्थानकावर सुरक्षा दलांचे 24 तास लक्ष असतं. जर तुमच्याकडे व्हिसा नसेल तर आणि तुम्ही या स्टेशनवर उतरल्यास तुमच्यावर कारवाई होते. 14 फॉरेन अॅक्टनुसार तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि तुम्हाला शिक्षा होते. 

2/5

नाव नसलेलं स्टेशन

झारखंडची राजधानी रांचीहून तोरीला जाणारी ट्रेनने जाताना तुम्हाला एक अज्ञात स्थानक दिसतं. या स्टेशनवर त्या जागेचे कुठलेही साईन बोर्ड तुम्हाला दिसणार नाही. या स्थानकावरून 2011मध्ये पहिल्यांदा ट्रेन धावली तेव्हा या स्थानकाचे नाव बडकीचांपी असं नाव विचार करण्यात आला होता. मात्र कमले गावातील स्थानिकांनी या नावाला विरोध केला. या रेल्वे स्टेशनच्या निर्मीतीसाठी कमले गावाची जमीन आणि मजुर घेण्यात आले होते. म्हणून या गावाचे नाव या स्टेशनला द्यावं, अशी या गावातील लोकांची इच्छा होती. या वादामुळे आजही या स्टेशनला नाव देण्यात आलेले नाही. 

3/5

नाव नसून पण स्टेशन कार्यरत

तुम्ही कधी या स्टेशनबद्दल ऐकलं का, ज्या स्टेशनला नाव नाही पण ते पूर्णपणे कार्यरत आहे. पश्चिम बंगालमधील वर्धमानपासून 35 किमी अंतरावर असलेल्या बांकुरा-मसग्राम रेल्वे मार्गावरील हे अज्ञात रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन 2008मध्ये बांधण्यात आलं होतं. तेव्हा त्याला रैनागढ नाव देण्यात आलं होतं. मात्र रैना गावातील लोकांना हे नाव आवडलं नाही. त्यांनी रेल्वे बोर्डला स्टेशनचं नाव बदलण्यासाठी तक्रार केली. त्यानंतर या स्थानकाला अद्याप कुठलही नाव देण्यात आलं नाही. 

4/5

भवानी मंडी

दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावर असलेल्या भवानी मंडी हे रेल्वे स्टेशन दोन वेगवेगळ्या राज्यांशी संबंध आहे. हे अनोखे रेल्वे स्थानक राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विभागले गेले आहे. ज्यामुळे भवानी मंडी येथे थांबणाऱ्या प्रत्येक ट्रेनचे इंजिन राजस्थानमध्ये असतं आणि त्याचे डबे मध्य प्रदेशच्या भूमीत असतं. गंमत म्हणजे भवानी मंडी रेल्वे स्टेशनवर एका टोकाला राजस्थान तर दुसऱ्या टोकाला मध्य प्रदेशचा बोर्ड लावण्यात आला आहे. 

5/5

नवापूर

भारतातील सर्वात वेगळ आणि अनोख्या रेल्वे स्टेशनच्या यादीत नवापूर रेल्वे स्टेशनचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या स्टेशनचा एक भाग महाराष्ट्रात तर दुसरा भाग गुजरातमध्ये आहे. यामुळे या स्टेशनवरील प्लॅटफॉर्मपासून बेंचपर्यंत प्रत्येक गोष्टीवर महाराष्ट्र आणि गुजरात लिहिलेले आहेत. तसंच स्टेशनवर घोषणा इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती या चार भाषांमध्येही केल्या जातात.