आता वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये झोपून करा प्रवास; नवीन स्लीपर ट्रेनचा फर्स्ट लूक समोर

रेल्वेकडून एकामागून एक देशभरात वंदे भारत गाड्या चालवल्या जात आहेत. सध्या चेअरकार वंदे भारत गाड्या चालवल्या जात आहेत. पण लवकरच तुम्हाला वंदे भारतमध्ये झोपून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

Oct 04, 2023, 09:50 AM IST

वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन पुढील वर्षी मार्चपर्यंत देशातील रुळांवर धावताना दिसणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 3 ऑक्टोबर रोजी या ट्रेनच्या संकल्पनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

1/7

फर्स्ट लूक समोर

vande bharat sleeper first look

स्लीपर वंदे भारत गाड्या सुरू होणार आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा फर्स्ट लुकही समोर आला आहे. ट्रेनमधील फोटो पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होणार आहे.

2/7

स्लिपर ट्रेनमध्ये जागतिक दर्जाची वैशिष्टे

vande bharat sleeper World Class Features

3/7

कधी होणार सुरु?

vande bharat sleeper When will it start

चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) महाव्यवस्थापक बीजी मल्ल्या यांनी सांगितले होते की या आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये वंदे भारतचे स्लीपर व्हर्जन लॉन्च केले जाईल. तसेच या आर्थिक वर्षात वंदे मेट्रोही सुरू होऊ शकते.

4/7

वंदे भारतमध्ये रात्रीचा प्रवास सोपा

Overnight travel made easy in Vande Bharat

माध्यमांच्या वृत्तानुसार, पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये 857 बर्थ असतील प्रत्येक कोचमध्ये तीन शौचालये आणि एक मिनी पॅन्ट्री देखील असू शकते. त्यामुळे आता प्रवाशांना लांब पल्ल्याचा आणि रात्री स्लीपर ट्रेनमध्ये प्रवास करणे सोपे होणार आहे.

5/7

आणखी काही खास सुविधा

vande bharat sleeper Some more special facilities

ट्रेनमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअरची व्यवस्था असेल. रिक्लाईन अँगल व्यतिरिक्त, मऊ कुशन सीट्स, मोबाईल चार्जिंग पॉइंट, फूट रेस्ट एक्स्टेंशन वाढवण्यात आले आहे.

6/7

पॅन्ट्री कार नसणार

vande bharat sleeper pentry car

स्लीपर वंदे भारतला पॅन्ट्री कारचा डबा नसेल, असे सांगण्यात येत आहे. ट्रेनच्या प्रत्येक डब्यात एक मिनी पॅन्ट्री असेल, जी त्या  डब्यातील प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरवेल. 

7/7

किंमत किती?

vande bharat sleeper price

ही वंदे भारत चेअर कारपेक्षाही महाग होणार आहे. स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची किंमत इंटिग्रल कोच फॅक्टरीने अंदाजे 127 कोटी रुपये सांगितली आहे.