कोरोनापासून बचावासाठी रेल्वे डब्यांमध्ये 'असे' बदल

कोरोना व्हायरसविरोधात संपूर्ण जग लढा देत आहे. कोरोनामुळे जगण्यापासून ते अगदी प्रवास करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. 

Jul 15, 2020, 17:57 PM IST

कोरोनापासून बचाव करण्यासाठी, कोरोनानंतर रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा या उद्देशाने भारतीय रेल्वेने नवीन रेल्वे कोच तयार केले असून रेल्वे डब्ब्यांमध्ये काही बदल केले आहेत. 

1/8

सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कपूरथळामध्ये, रेल्वेच्या नवीन कोचमध्ये अनेक बदल केले गेले आहेत, जेणेकरून प्रवासात कोरोना संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल.

2/8

नव्या बदलांनुसार, डब्ब्यांमध्ये अनेक हँड्स फ्री सुविधा असणार आहेत. पाण्याचे नळ, दरवाजाचे हँडल यांना स्पर्श करण्याची गरज भासणार नाही.

3/8

रेल्वे डब्ब्यातील हँडल, दरवाजाचे हँडल, लॅच इत्यादींवर तांब्याचं-कॉपर कोटिंग करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रभाव कॉपर कोटिंगवर लवकर संपुष्टात येतो, अशी माहिती आहे. कॉपरच्या संपर्कात आल्यानंतर हा व्हायरस अधिक काळ सक्रिय राहत नाही. शौचालयात फुट ऑपरेटेड फ्लशची सुविधा देण्यात आली आहे. 

4/8

ट्रेनच्या कोचमध्ये दरवाजे, हँडल्स, टॉयलेट सीट, काचेच्या खिडक्या इत्यादी संपर्कात येणाऱ्या जवळजवळ प्रत्येक ठिकाणी किंवा पृष्ठभागावर टायटॅनियम डायऑक्साइडचं कोटिंग करण्यात आलं आहे. टायटॅनियम डायऑक्साइड व्हायरस किंवा बॅक्टेरियाची वाढ नष्ट करते. एवढंच नाही तर हवेची गुणवत्ताही चांगली होते. त्याचं कोटिंग 12 महिन्यांपर्यंत प्रभावी राहतं.

5/8

शौचालयाबाहेर असणाऱ्या वॉश बेसिनसाठीही हाताचा वापर करण्याची गरज लागणार नाही. फुट प्रेसद्वारेच पाण्याचा नळ किंवा साबणाचा वापर करता येऊ शकतो.   

6/8

एसी कोचमध्ये प्लाज्मा एअर प्युरिफिकेशनची व्यवस्था केली गेली आहे. जेणेकरून प्रवाशांना स्वच्छ हवा दिली जाऊ शकेल आणि प्लाज्माच्या माध्यमातून कोच सतत सॅनिटाईज केला जाऊ शकेल.

7/8

डोअर हँडलऐवजी फुट प्रेस, पायाद्वारे दरवाजा उघडता येऊ शकतो.

8/8

रेल्वेनुसार, असे पोस्ट कोविड कोच तयार करण्यासाठी सुमारे 7 ते 8 लाख रुपये खर्च येतो, या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात रेल्वे कोचमध्ये असे बदल केले जातील.