रात्रीच्या प्रवासात 'ही' चूक अजिबात करू नका, दंडच नव्हे तर जेलही होऊ शकते

ट्रेनने प्रवास करत असताना रेल्वेचेदेखील काही नियम असतात. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येतो. तर काही प्रकरणात तुरुगांतही जावे लागू शकते. काय आहेत हे नियम जाणून घेऊयात. 

| Jul 12, 2024, 14:00 PM IST

Indian Railway Rules: ट्रेनने प्रवास करत असताना रेल्वेचेदेखील काही नियम असतात. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येतो. तर काही प्रकरणात तुरुगांतही जावे लागू शकते. काय आहेत हे नियम जाणून घेऊयात. 

1/7

रात्रीच्या प्रवासात 'ही' चूक अजिबात करू नका, दंडच नव्हे तर जेलही होऊ शकते

Indian Railways Rules Every Passenger Must Know Before Travelling In Train

 भारतात लांब पल्ल्याचा प्रवास करताना नागरिक ट्रेनचाच पर्याय निवडतात. ट्रेनने प्रवास करताना या काही नियमांबद्दल माहिती अवश्य असू द्यात. 

2/7

Indian Railways Rules Every Passenger Must Know Before Travelling In Train

ट्रेनने प्रवास करत असताना किंवा रेल्वे स्थानकांवर चुकून रेल्वेच्या काही नियामांचे उल्लंघन केले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्हाला फक्त दंडच नाही तर थेट तुरुंगातही जाऊ लागू शकते. 

3/7

ज्वलनशील किंवा विस्फोटक पदार्थ

Indian Railways Rules Every Passenger Must Know Before Travelling In Train

 रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनमधून ज्वलनशील किंवा विस्फोटक सामान घेऊन जाण्यास बंदी आहे. अशामध्ये तुम्ही फटाके, केरोसीन तेल, पेट्रोल, गॅस सिलेंडर सारख्या सामानांसोबत पकडले गेल्यास रेल्वे अधिनियम 1989 कलम164 अंतर्गंत 1 हजार रुपयांचा दंड आणि 3 वर्षांपर्यंतची जेल होऊ शकते. 

4/7

रात्री ही चूक करू नका

Indian Railways Rules Every Passenger Must Know Before Travelling In Train

रेल्वेने प्रवास करत असताना प्रवाशांची झोपमोड होऊ नये साठी टीटीई रात्री तिकिटदेखील चेक करत नाही. अशातच रेल्वे प्रवाशांकडून अशी अपेक्षा असते की, ते त्यांच्यासोबत असलेल्या इतर प्रवाशांच्या झोपेची काळजी घ्याल. जर रात्री तुम्ही ट्रेनमध्ये मोठमोठ्याने बोलणे किंवा गाणी म्हणत असाल आणि त्यामुळं एखाद्या प्रवाशाने तुमची तक्रार केली तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात.   

5/7

धु्म्रपान महागात पडू शकते

Indian Railways Rules Every Passenger Must Know Before Travelling In Train

ट्रेनच्या आत किंवा रेल्वे स्थानकांवर धुम्रपान करताना किंवा मद्यपान करताना पकडले गेले असाल तर त्यामुळं तुम्ही अडचणीत येऊ शकता. टीटीईने तुम्हाला पकडले तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो तसंच, तीन वर्षांपर्यंतची जेल होऊ शकते. ट्रेनमधून प्रवास करत असताना धुम्रपान आणि मद्यपान करु नये. 

6/7

विनातिकिट प्रवास

Indian Railways Rules Every Passenger Must Know Before Travelling In Train

विनातिकिट ट्रेनमधून प्रवास करणे हा दंडनीय अपराध आहे. तरीदेखील बरेचसे प्रवासी विनातिकिट प्रवास करतात. विनातिकिट प्रवास करताना कोणी आढळला तर तुम्हाला जेल होऊ शकते.   

7/7

Indian Railways Rules Every Passenger Must Know Before Travelling In Train

 रेल्वेच्या या नियमांचे पालन सर्वांनी करावे, असं अवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे