Indian Railways : 'ही' आहेत सर्वाधिक उंचीवर असणारी जगात भारी रेल्वे स्थानकं; पाहून आताच जायचा बेत आखाल
Indian Railways : यामध्ये पर्वतरागांमध्ये स्थिरावलेली रेल्वे स्थानकं विशेष आकर्षणाचा भाग. ही स्थानकं आणि त्याच्या आजुबाजूला असणारा परिसर इतका सुरेख की फोटो पाहूनही तडक तिथे जाण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही.
Indian Railways : प्रवाशांना सुविधा देण्यासोबतच भारतीय रेल्वे आणखी एका कारणासाठी ओळखली जाते. ते कारण म्हणजे रेल्वे प्रवासादरम्यान दिसणारं नैसर्गिक सौंदर्य. देशाच्या विविध भागांमधून जाणाऱ्या रेल्वेमार्गांवरून तितक्याच विविधरुपी निसर्गाची छटा आजवर अनेकदा प्रवाशांना पाहायला मिळाली आहे.