भारतातील सर्वात फ्लॉप चित्रपट; बजेट 45 कोटी, कमवले फक्त 1 लाख रुपये!

India's Most Flop Movie; चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सतत उशीर होत होता.हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्या कमी चित्रपटगृहांत हा चित्रपट लावला गेला.

Sep 03, 2024, 17:06 PM IST

भारतातील सर्वात फ्लॉप चित्रपट; बजेट 45 कोटी, कमवले फक्त 1 लाख रुपये! ओटीटी आणि चित्रपटातगृह दोन्हीकडे प्रदर्शित होणार होता पण दोन्हीकडे तर सोडाच दिग्दर्शनसूद्धा पूर्ण झाले नाही.

1/5

भारतातला एक असा फ्लॉप चित्रपट

अजय बहल दिग्दर्शित 'द लेडी कीलर' या चित्रपटात अर्जुन कपूर आणि भुमी पेडणेकर प्रमुक भूमिकेत होते. चित्रपटासाठी 45 करोड खर्च करण्यात आले होते. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सतत उशीर होत होता. शेवटी नोव्हेंबर 2023 मध्ये  चित्रपट प्रदर्शित  झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फक्त 1 लाख कमावले. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाने केलेली ही सर्वात कमी कमाई आहे.   

2/5

फक्त 293 तिकीटांची विक्री

ओटीटीवर येण्यापूर्वी हा चित्रपट काही ठराविक चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणार होता. हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्या कमी चित्रपटगृहांत हा चित्रपट लावला गेला. चित्रपटाची फक्त 293 तिकीटे विकली गेली. एका दिवसाची कमाई फक्त 38,000 झाली होती, जे एका चित्रपटासाठी निराशाजनक होते.

3/5

अर्धवट प्रदर्शित झालेला चित्रपट

ओटीटीच्या प्रदर्शनासंदर्भात द लेडी कीलरच्या निर्मात्यांवर करार बंधने होती. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यायला हवा असा करार होता. डिसेंबरमध्ये ओटीटीवर येण्यासाठी नोव्हेंबरच्या सुरुवातीला चित्रपटगृहात प्रदर्शित  होणे गरजेचे होते. नियमांमुळे आणि वेळेत चित्रपट पूर्ण न झाल्याने अर्धवट राहिलेला चित्रपट तसाच प्रदर्शित केला गेला.  

4/5

जाहिरात केली गेली नाही

चित्रपट अर्धवट प्रदर्शित केला गेला म्हणून चित्रपटातील मुख्य कलाकार अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांनी चित्रपटाचं प्रमोशन करण्यास नकार दिला.त्यामूळे एक ट्रेलर सोडला तर चित्रपटासंदर्भात मुलाखत किंवा अन्य काहीही जाहिरात दिसली नाही.  

5/5

ओटीटीवर आलाच नाही

चित्रपट अपूर्ण अवस्थेत प्रदर्शित होण्याचे मुख्य कारण होते ओटीटीवर प्रदर्शित होण्याबाबतचा करार. मात्र, ज्या कारणासाठी चित्रपट अर्धवट प्रदर्शित झाला त्या ओटीटींवर चित्रपटाला जागाचं मिळाली नाही. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना एवढा जास्त फ्लॉप झालेला चित्रपट ओटीटीवर घेण्यास भीती वाटत होती. त्यामुळे हा चित्रपट कोणत्याच ओटीटीवर दिसत नाही.