फोटो : ज्वालामुखीचं रौद्र रुप, 5 किलोमीटर पर्यंत पसरला धूर

Mar 03, 2021, 18:16 PM IST
1/5

इंडोनेशिया पेसिफिक रिंग ऑफ फायर (Pacific Ring of Fire) भागात आहे. हे क्षेत्र भूंकपग्रस्त भागात येतं. येथे अनेकदा भूंकप होतात आणि ज्वालामुखीमध्ये हालचाली होतात.

2/5

राख का गुबार

राख का गुबार

ज्वालामुखी माउंट सिनाबंगचा उद्रेक झाल्यानंतर त्याची पहिली झलक पाहायला मिळाली. पण काही वेळेत ती बंद झाली. उद्रेकानंतर जवळपास 5 किलोमीटरपर्यंत राख आणि धूर दिसत होता.

3/5

मागील वर्षभरापासून ज्वालामुखी माउंट सिनाबंग (Volcano Mount Sinabung) मध्ये सक्रिय गोष्टी दिसत आहेत. त्यामुळे उत्तर सुमात्रा प्रांतात अलर्ट जारी केला आहे. स्फोटात आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. इंडोनेशियाच्या वॉल्कैनोलॉजी अँड जियोलॉजिकल हजार्ड मिटिगेशन सेंटर (Volcanology and Geological Hazard Mitigation Centre) ने  माउंट सिनाबंग ज्वालामुखीच्या आजुबाजुला राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले होते.

4/5

इंडोनेशियामध्ये 130 एक्टिव ज्वालामुखी आहेत. जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत ते सर्वाधिक आहेत. माउंट सिनाबंग थंडीमध्ये शांत होते. पण 2010 नंतर आतापर्यंत येथे अनेकदा स्फोट झाला आहे. 8070 फूट उंच या ज्वालामुखीने 2013  मध्ये मोठं नुकसान केलं होतं.

5/5

15 सप्टेंबर 2013 मध्ये झालेल्या स्फोटानंतर 3700 लोकांना सुरक्षित स्थानावर स्थलांतरिक केलं होतं. 4 जानेवारी 2014 ला झालेल्या स्फोटात 24 तासात अनेक स्फोट झाले होते. 2016 मध्ये 22 मेला झालेल्या स्फोटात ७ लोकांचा जीव गेला होता. ३ लोकं गंभीर जखमी झाले होते. 2017, 2018, 2019 आणि 2020 मध्येही ज्वालामुखीचा स्फोट झाला होता पण अधिक नुकसान झालं नव्हतं.