Indu Mill : 2024 मध्ये पूर्ण होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक; पाहा Exclusive Photos

Indu Mill : राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) दादर येथील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे.

Apr 14, 2023, 11:14 AM IST
1/6

Indu Mill near Chaityabhoomi in Dadar

दादर येथील चैत्यभूमीलगत असलेल्या इंदू मिलच्या जागेवर हे स्मारक उभे राहत आहे. ही जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मिळावी, अशी मागणी आंबेडकरी जनतेची 1989 पासून होती. त्यानंतर सर्व मागण्या पूर्ण झाल्यानंतर 2015 साली स्मारकाचे काम सुरु झाले. 

2/6

indu mill pm modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. मात्र प्रत्यक्ष काम सुरु होण्यास 2018 साल उजाडावे लागले. त्यानंतर आता 2024 साली हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

3/6

indu mill mmrda

इंदू मिल येथे 12 एकर जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीवर सोपविण्यात आली आहे. 

4/6

indu mill ambedkar statue

या स्मारकाचे मुख्य आकर्षण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 450 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. 

5/6

indu mill smarak

या स्मारकात विहार, विपश्यना केंद्र, ग्रंथालय, माहिती केंद्र, सभागृह, वाहनतळ, तिकीटघर, सामान कक्ष, स्वच्छतागृह, नियंत्रण कक्ष, उपाहारगृह आणि अन्य सुविधांचा उपलब्ध करण्यात येणार आहेत. 

6/6

indu mill land

सुरुवातीला या स्मारकाचा अंदाजित खर्च 425 कोटी रुपये होता. त्यानंतर विविध कारणांमुळे स्मारकाचा खर्च 2017 मध्ये 709 कोटी रुपयांवर पोहोचला. आता तर हा खर्च थेट एक हजार कोटी रुपयांवर गेला असून एमएमआरडीएने या निधीला मान्यता दिली आहे.