Republic Day 2023 : घरबसल्या नव्हे, थेट राजपथावरूनच LIVE पाहा परेड; पाहा सोपी Online Process

Republic Day 2023 : राजपथावर दरवर्षी होणाऱ्या पथसंचलनाचे याचीदेही याची डोळा साक्षीदार व्हायचंय? अगदी सोपी प्रक्रिया पूर्ण करून तुम्हीही यंदा घ्या हा अनुभव. 

Jan 20, 2023, 09:51 AM IST

Republic Day 2023 : प्रजासत्ताक भारतानं आणखी एका उज्वल पर्वात पदार्पण केल्याची जाणीव करून देणारा देशाचा प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सैन्यदलं आणि भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून या दिवसाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारीही सुरु आहे. 

1/5

Republic Day 2023 : घरबसल्या नव्हे, थेट राजपथावरूनच LIVE पाहा परेड; पाहा सोपी Online Process

easy way to book Online Ticket for Republic Day Parade 2023 know details

दिल्लीमध्ये सध्या या दिवसाच्या पार्श्वभूमीवर विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी आणि राजपथावरील पथसंचलनामध्ये अर्थात Republic Day Parade 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी सैन्यातील जवान आणि प्रत्येक राज्याच्या काही मंडळींनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. 

2/5

Republic Day 2023 : घरबसल्या नव्हे, थेट राजपथावरूनच LIVE पाहा परेड; पाहा सोपी Online Process

easy way to book Online Ticket for Republic Day Parade 2023 know details

प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणारी ही परेड अनेक कारणांनी खास असते. तुम्हालाही ती प्रत्यक्षात पाहायचीये? त्यादरम्यान तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतलं कुणी तिथं जवळपास असणार आहे? मग पाहा या परेडसाठी तुम्ही ऑनलाईन तिकीट कसं बुक करू शकता.   

3/5

Republic Day 2023 : घरबसल्या नव्हे, थेट राजपथावरूनच LIVE पाहा परेड; पाहा सोपी Online Process

easy way to book Online Ticket for Republic Day Parade 2023 know details

www.aamantran.mod.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही ही तिकीट बुक करू शकता. सध्याच्या घडीला दररोज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एका दिवसात किती तिकीटांची विक्री होईल याबाबतची माहिती देण्यात येते. ही तिकीटं 20 ते 500 रुपयांच्या दरांमध्ये उपलब्ध आहेत. यासाठी तुम्ही संकेतस्थळावर लॉगईन करणं अपेक्षित असेल. यानंतर मोबाईल क्रमांक टाईप करताच तुम्हाला कॅप्चा आणि OTP तिथं द्यावा लागेल. 

4/5

Republic Day 2023 : घरबसल्या नव्हे, थेट राजपथावरूनच LIVE पाहा परेड; पाहा सोपी Online Process

easy way to book Online Ticket for Republic Day Parade 2023 know details

पुढे काही वैयक्तिक माहितीची पूर्तता केल्यानंतर तुम्ही ज्या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून सहभागी होऊ इच्छिता हे निवडा. इथं तुम्ही, रिपब्लिक डे परेड, रिहर्सल बीटिंग द रिट्रीट, बीटिंग द रिट्रीट एफडीआर आणि बीटिंग  द रिट्रीट यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता. 

5/5

Republic Day 2023 : घरबसल्या नव्हे, थेट राजपथावरूनच LIVE पाहा परेड; पाहा सोपी Online Process

easy way to book Online Ticket for Republic Day Parade 2023 know details

स्वत:ची माहिती देत असताना इथं तुम्ही काही ओळखपत्रही सादर करणं अनिवार्य असेल. त्यानंतरच ही प्रक्रिया पुढे जाईल. त्यामुळं तुम्ही योगायोगानं 26 जानेवारीच्या दरम्यान दिल्ली किंवा त्यानजीकच्या भागात असाल आणि वेळेचं नियोजन करून या सोहळ्याला जाणं शक्य होणार असेल तर एकदा हा अनुभव नक्की घ्या.