सीसीटीव्ही कॅमेरे, बायो टॉयलेट अन् आरामदायी कोच; पाहा अमृत भारत ट्रेन खास फोटो
Amrit Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील अयोध्येतून पहिल्या अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. ज्यात फक्त द्वितीय श्रेणी आणि स्लीपर श्रेणीचे डबे असतील. नवीन अमृत भारत ट्रेनमधील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
1/9
2/9
3/9
अमृत भारत ट्रेनसोबतच पंतप्रधान सहा नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, अमृतसर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, कोईम्बतूर-बंगळुरु कॅन्ट वंदे भारत एक्सप्रेस, मंगलोर-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
4/9
5/9
6/9
7/9
अमृत भारत ट्रेन्समधील धक्के टाळण्यासाठी कंपनविरोधी उपाय, सीलबंद व्हेस्टिब्युल गॅंगवे , व्हेंटसह एसीपी पॅनेलिंग लावण्यात आले आहे. यासोबतच या ट्रेनच्या गार्ड रूममध्ये मॉनिटर्ससह लगेज रूममध्ये सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प, नाविन्यपूर्ण बाह्य रंगसंगती, उत्तम आणि सौंदर्यपूर्ण प्रकाशयोजना करण्यात आली आहे.
8/9
अमृत भारत ट्रेनचे आतील भागही खास डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये फोल्ड करण्यायोग्य स्नॅक टेबल, योग्य होल्डरसह मोबाईल चार्जर, फोल्ड करण्यायोग्य बाटलीसाठी स्टॅंण्ड, सुखकारक आणि सोयीस्करपणे डिझाइन केलेले सीट आणि बर्थ, सुधारित लगेज रॅक, एरोसोल आधारित अग्निशमन यंत्रणा, रेडियम इल्युमिनेशन फ्लोअर स्ट्रिप, एफडीबी बाजूला हलवलेल्या सीसीटीव्हीचा समावेश आहे.
9/9