1 तारखेलाच नवीन संकल्प का करतात? Dietमध्ये 10 गोष्टींचा नक्की विचार करा
New Year Diet Resolution : 2024 हे वर्ष अगदी दोन दिवसावर येऊन ठेपलं आहे. नवीन वर्ष, नवीन संकल्प असा अनेकांचा विचार असतो. अशावेळी डाएट फॉलो करताना 10 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
नवीन वर्ष, नवीन संकल्प आणि नवा डाएट प्लान .. असा अनेकांचा विचार असेल. पण नवीन संकल्प हा 1 जानेवारीलाच का सुरु केला जातो. तसेच नवीन संकल्पामध्ये डाएट प्लान, वजन कमी करणे हा उद्देश नक्कीच असतो. अशावेळी वजन कमी करताना कोणता डाएट फॉलो केला पाहिजे यापेक्षा डाएट करताना कोणत्या 10 गोष्टींचा आवर्जून विचार करायला हवा. हे न्यूट्रिशनिस्ट अमिता गदरे यांनी 'अमक तमुक' या यूट्यूब चॅनलवर सांगितलं आहे.