वाढत्या वयानुसार तुमच्या मुलांची उंची वाढत नाही? उद्यापासून सुरू करा 'ही' पाच योगासने

International Yoga Day : दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात शरिराचा व्यायाम हा महत्तवाचा असतो. दररोज योगसने केल्याने शरीर लवचिक राहते. तुमच्या मुलांना तुम्ही योगासने (Yoga For Height Growth) आत्ताच सुरू करायला लावा.

| Jun 19, 2024, 16:46 PM IST

Yoga For Height Growth: भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या, त्यातील एक गोष्ट म्हणजे योग.. दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2024) साजरा केला जातो. भारताने योगाचं महत्त्व पटवून दिल्यानंतर आता जगभरात योगाचे आयोजन केले जाते. 

 

1/9

मुलांची उंची

मुलांचं वय 10 किंवा 12 झालं की पालकांना एकच चिंता सतावते, ती म्हणजे उंची वाढेल की नाही. मुलांची उंची वाढवण्यासाठी पालक अनेक प्रयत्न करतात.

2/9

योगासने

अशातच काही योगासने केल्याने तुमच्याही मुलांची उंची वाढत्या वयानुसार वाढलेली दिसेल. फक्त योगासने करताना सातत्य असावं. योगासने करून तुम्ही नैसर्गिक पद्धतीने उंची वाढवू शकता.

3/9

आनंद बालसना (Ananda Balasana)

आनंद बालसना आसनाच्या सरावाने मानसिकता आणि शरीर जागरूकता सुधारते. आनंद बालासनासारख्या योगासनांमुळे जीवनाचा दर्जा सुधारू शकतो.

4/9

चक्रवकासन (Cat-Cow Stretch)

चक्रवाकसन योग मुद्रा देखील स्नायूंना बळकट करण्यासाठी खूप प्रभावीपणे कार्य करते. यामुळे शरीरातील स्नायू मजबूत देखील होतात.

5/9

सेतू बंधासन (Setu Bandha Sarvangasana)

सेतू बंध सर्वांगासनामुळे तुमच्या पाठीच्या स्नायूंना बळकट करण्यात, तुमची छाती, मान आणि पाठीचा कणा ताणण्यास आणि तुमची मुद्रा सुधारण्यास मदत होते.

6/9

भुजंगासन (Bhujangasana)

भुजंगासन हा उंची वाढवण्याच्या सर्वोत्तम व्यायामांपैकी एक आहे. त्यामुळे तुमचं शरीर देखील अधिक काटक बनतं. 

7/9

अधोमुख श्वानासन (adho mukha svanasana)

शरीराचा थकवा घालवण्यासाठी आणि उंची वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आसन म्हणजे अधोमुख श्वानासन मानलं जातं. गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह सुरु होतो.

8/9

वृक्षासन (Vrishasana)

वृषासनाचा उपयोग तुम्हाला शरीराचा बॅलेन्स आणि स्टेबिलिटीसाठी होतो. वृक्षासनाचा सराव नियमितपणे केल्यास शरीरामधील ऊर्जेचे प्रमाण वाढत जाते.

9/9

ताडासन (Tadasana)

ताडासन हे योगासन आपली उंची वाढवण्यासाठी आणि शरिराला पायांपासून हातापर्यंत ताणण्यासाठी प्रभावीपणे कार्य करते. ताडासनाचा नियमित व्यायाम केल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो.