टेम्पो ड्राईव्हरचा मुलगा IPL मध्ये या संघाकडून खेळणार, लिलावात करोडोंची बोली

Feb 19, 2021, 22:35 PM IST
1/5

आयपीएल लिलावात  (IPL Auction 2021)  राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) फ्रेंचाइजीने चेतन सकारिया (Chetan Sakariya) ला 1.2 कोटीमध्ये खरेदी केलं आहे.

2/5

चेतन सकारिया (Chetan Sakariya)  च्या माहितीनुसार त्याच्या भावाने जानेवारी 2021 मध्ये आत्महत्या केली होती. तेव्हा तो घरी नव्हता. आणि सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) खेळत होता. जेव्हा चेतन घरी आला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला ही दु:खद घटना सांगितली.

3/5

आयपीएल पर्यंत त्याचा प्रवास नक्कीच अवघड होता. चेतन सकारिया (Chetan Sakariya) चं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. 2 वर्षापूर्वी त्याच्या वडिलांनी टेम्पो चालकाची नोकरी सोडली. ५ वर्षापूर्वी त्यांच्याकडे टीव्ही देखील नव्हता. तेव्हा चेतन त्याच्या मित्रांकडे जावून क्रिकेटचे सामने पाहायचा.

4/5

चेतन सकारिया (Chetan Sakariya) आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये आरसीबीचा भाग होता. तो टीममध्ये नेट बॉलर म्हणून होता. त्याने या दरम्यान कोच सायमन कॅटिच (Simon Katich) आणि माईक हेसन (Mike Hesson) यांना आपल्या कामगिरीने खूश केलं.

5/5

चेतन सकारिया (Chetan Sakariya) म्हणतो की, 'आता त्याच्या वडिलांना काम करावे लागू नये. त्याला आता त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे. त्यासाठी त्याला एक चांगलं घर खरेदी करायचं आहे.'