IPL 2023 : ...तर आज अर्जुन तेंडुलकर गुजरात टायन्सच्या संघात असता

IPL 2023 : आयपीएलची स्पर्धा नेहमीच नव्या प्रतिभावान खेळांडूंना संधी देत असते. मुंबई इंडिन्सच्या संघातूनही अनेक नवोदित खेळाडूंनी पुढे येत आपली छाप पाडली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ हा नेहमीच तरुण खेळाडूंना व्यासपीठ देण्याचे काम करत असतो. खराब कामगिरी असतानाही मुंबईने दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, हृतिक शोकीन आणि कुमार कार्तिकेय यांसारख्या तरुण खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. 

Apr 20, 2023, 18:36 PM IST
1/7

arjun tendulkar MI

गेली दोन वर्षे संधी न मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरलाही या आयपीएलच्या मोसमात संधी मिळाली आहे. 2021 मध्ये अर्जुन मुंबई इंडियन्सच्या संघासोबत जोडला गेला होता. पण प्रत्यक्षात दोन वर्षांनी त्याला खेळायची संधी मिळाली.

2/7

arjun tendulkar vs SH

पदार्पणाच्या सामन्यातच अर्जुन तेंडुलकरने दमदार कामगिरी केली आहे. हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला बाद करून अर्जुनने आयपीएलमधली पहिली विकेट घेतली होती.

3/7

arjun tendulkar jersey

आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर 24 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरला आहे. सचिन तेंडुलकरचा वाढदिवस 24 तारखेला असल्याने अर्जुनच्या जर्सीवर 24 नंबर लिहिलेला आहे. यासोबतच अर्जुनचाही जन्म 24 सप्टेंबर 1999 ला झाला होता.

4/7

arjun tendulkar salary

अर्जुन तेंडुलकरला 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. तर आयपीएल 2022 च्या लिलावात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना विकत घेतले होते. अर्जुन तेंडुलकरला संघात घेण्यासाठी गुजरात टायटन्सने 25 लाखांची बोलीही लावली होती. मात्र मुंबईच्या संघाने त्याला आपल्या संघात सामील करुन घेतले.

5/7

Arjun Tendulkar pull out of the tournament due to injury

शेवटच्या दोन्ही हंगामात अर्जुनला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. तर गेल्या मोसमात दुखापतीमुळे अर्जुनला संयुक्त अरब अमिरातीतील स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातूनही बाहेर पडावे लागले होते.

6/7

arjun tendulkar in playing 11

दोन वर्षे डगआऊटमध्ये बसलेल्या अर्जुनने यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले आहे. 16 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स खेळवल्या गेलेल्या सामन्यात अर्जुनने एका ओव्हरमध्ये केवळ चार धावा दिल्या होत्या. तर 18 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला बाद करत आयपीएलमधील पहिली विकेट मिळवली होती.

7/7

arjun tendulkar bowling

दरम्यान, हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अर्जुनने सचिन तेंडुलकरलाही न जमलेला विक्रम करुन दाखवला होता. आयपीएलमध्ये खेळताना सचिननेही गोलंदाजी केली होती. मात्र त्याला विकेट मिळाली नव्हती. मात्र सामन्याच्या महत्त्वाच्या क्षणी अर्जुनने भुवनेश्वरला बाद करुन सचिनचा विक्रम मोडला होता. (सर्व फोटो - अर्जुन तेंडुलकर/ इन्स्टाग्राम)