नव्या हंगामाआधी आयपीएलमध्ये मोठा उलटफेर, 'या' 7 मॅचविनर खेळाडूंना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता

IPL 2024 Released Players: इंडियन प्रीमिअर लीग  2024 साठी येत्या 19 डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे. त्याआघी 26 नोव्हेंबरला सर्व 10 संघांनी आपल्या रिटेन (Retain) आणि रिलीज (Released) खेळाडूंची यादी जाहीर केली. काही फ्रेंचाईजीने असे खेळाडू रिलीज केलेत, जे एकहाती सामना जिंकू देऊ शकतात. यापैकी पाच खेळाडूंपैकी आपण जाणून घेऊया, ज्यांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही संघांनी त्यांना रिलीज केलंय. 

| Nov 27, 2023, 18:02 PM IST
1/7

आयपीएलआधी मोठी घडमोड

आयपीएलच्या नव्या हंगामासाठी सर्व दहा संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात सर्वात मोठी घडामोड ठरली ती हार्दिक पांड्याची. गुजरात टायटन्सची साथ सोडत हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. नाट्यमय घडामोडींनंतर हा निर्णय घेण्यात आला. स्वत: हार्दिक पांड्यानेही दुजोरा दिला आहे.

2/7

जोफ्रा आर्चरला सोडलं

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघात घेतलं असतानाच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 2023 आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरवर 8 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. पण अवघ्या एका वर्षात त्याला रिलीज केलं आहे. जोफ्रा आयपीएलमध्ये एकूण 40 सामने खेळला असून यात त्याने 48 विकेट घेतल्या आहेत. 

3/7

शाहरुख खान

2023 आयपीएलमध्ये पंजाब किंग्सने 9 करोडहून अधिकची बोली लावत आक्रमक फलंदाज शाहरुख खानला आपल्या संघात घेतलं. शाहरुखने आपल्या कामगिरीने छापही उमटवली, पण यानंतरही पंजाबने त्याला रिटेन केलेलं नाही. डेथ ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी शाहरुख खान ओळखला जातो. 

4/7

जोश हेजलवूड

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने वेगवान हुकमी गोलंदाज जोश हेजलवूडला रिलीज करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. बंगलोरने संघातील जवळपास सर्व वेगवान गोलंदाजांना रिलीज केलं आहे. हेजलवूडने आरसीबीसाठी गेल्या दोन हंगामात 15 सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत. हेजलवूड मार्च 2024 मध्ये बाबा बनणार आहे, त्यामुळे तो एक महिना गैरहजर असणार आहे, याच कारणामुळे संघाने त्याला रिटेन केलं नाही.

5/7

फिल साल्ट

फिल साल्टने आयपीएल 2023 हंगामात सलामी फलंदाज म्हणून दिल्ली कॅपिटल्समध्ये पृथ्वी शॉची जागा घेतली. 9 सामन्यात साल्टने 163.9 च्या स्ट्राईक रेटने 218 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सला त्याने अनेक सामन्यात आक्रमक सुरुवात करुन दिलीय. यानंतर दिल्लीने साल्टला मुक्त केलंय. 

6/7

हर्षल पटेल

2021 च्या हंगामात सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपचा मानकरी ठरलेला वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला आरसीबीने रिलीज केलं आहे. 2022 मध्येही हर्षने 19 विकेट घेतल्या होत्या. तर 2023 आयपीएलमध्ये त्याने 13 सामन्यात 14 विकेट घेतल्या होत्या.

7/7

उमेश यादव

2022 आयपीएल हंगामात 21 विकेट घेत खळबळ उडवून देणाऱ्या उमेश यादवला कोलकाता नाईट रायडर्सने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 2023 आयपीएलमध्ये उमेशने 8 सामन्यात केवळ 6 विकेट घेतल्या होत्या. बहुतेक यामुळेच केकेआरने उमेशला रिटेन केलेलं नाही.