IPL 2024 चे हिरो, आयपीएलचा सतरावा हंगाम 'या' पाच अनकॅप्ड खेळाडूंनी गाजवला

Top 5 Indian uncapped run-scorers in IPL 2024 : आयपीएलच्या प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाच्या हंगामातही काही युवा खेळाडू हिरो ठरले आहेत. यंदाच्या हंगामात पाच युवा खेळाडूंनी क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. या खेळाडूंनी दिग्गज क्रिकेटपटूंनाही मागे टाकत आपण भारतीय क्रिकेटचं भविष्य असल्याचं दाखवून दिलं आहे. आयपीएल 2024 मध्ये पाच अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. 

| May 27, 2024, 17:10 PM IST
1/5

सर्वाधिक धावा करणाऱ्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तो राजस्थान रॉयल्सचा रिआन पराग. या खेळाडूला रिटेन केल्याने राजस्थान रॉयल्सची खिल्ली उडवण्यात आली होती. पण आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रियानने दमदार कामगिरी करत टीकाकारांची तोंड बंद केली आहेत. रियानने 16 सामन्यात तब्बल 573 धावा केल्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडनंतर रियानचा नंबर लागतो.

2/5

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तो सनरायजर्स हैदराबादचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा. यंदाच्या हंगामात कर्णधार पॅट कमिन्सवर विश्वास टाकला आणि त्याला सलामीला संधी दिली. अभिषेकनेही कर्णधाराचा विश्वास खरा ठरवला. अभिषेकने 16 सामन्यात 484 धावा केल्या. तो पार्टटाईम फिरकी गोलंदाजीही करतो. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या. 

3/5

यंदाच्या हंगामात लक्षवेधी खेळाडू ठरला तो पंजाब किंग्स इलेव्हनचा शशांक सिंह. शशांकने काही सामन्यात पंजाबसाठी विजय अक्षरश: विजय खेचन आणला. शशांत हैदराबाद आणि दिल्लीच्या संघातून खेळला पण त्याला संधी देण्यात आली नव्हती. पण पंजाबमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली. छत्तीसगढच्या या आक्रमक फलंदाजाने 164.65 स्ट्राईक रेटने 354 धावा केल्या.  

4/5

पंजाब किंग्सचा सलामिवीर प्रभसिमरननेही यंदाच्या आयपीएल हंगामात चांगली कामगिरी केली. पंजाबच्या सर्व सामन्यात प्रभसिमरनला संधी मिळाली. प्रभसिमरने 14 सामन्यात  156.80 स्ट्राईक रेट होता. त्याने दोन अर्धशतकही लगावली.

5/5

दिल्ली कॅपिटल्सचा अभिषेक पोरेल हा युवा खेळाडू यंदा चांगलाच चमकला. अभिषेक पोरेलने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. अभिषेकने 12 सामन्यात 159.51 च्या स्ट्राइक रेटने 327 धावा केल्या.