Photos: मराठमोळ्या पदार्थांची परदेशी खेळाडूंना भूरळ! दादरच्या 'प्रकाश हॉटेल'मध्ये थालीपीठ, साबुदाणा वड्यावर ताव

IPL 2024 Foreigner Players Eat At Mumbai Local Hotel: मुंबई आणि राजस्थानच्या संघामध्ये रविवारी मुंबईतच सामना पार पडला. या सामन्यासाठी शहरात आलेल्या परदेशी खेळाडूंनी मराठमोळ्या पदार्थांवर ताव मारला. त्यांच्या या खाद्यभ्रमंतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जाणून घेऊयात याचसंदर्भात...

| Apr 06, 2024, 16:15 PM IST
1/7

IPL 2024 Foreigner Players Eat At Mumbai Local Hotel

रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडिमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सच्या संघांदरम्यान इंडियन प्रिमिअर लीगमधील सामना पार पडला. 

2/7

IPL 2024 Foreigner Players Eat At Mumbai Local Hotel

या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा यंदाच्या पर्वातील तिसरा पराभव झाला. राजस्थानच्या संघाने मुंबईच्या संघाला 6 विकेट्सने पराभूत केलं. 

3/7

IPL 2024 Foreigner Players Eat At Mumbai Local Hotel

मात्र या सामन्यासाठी मुंबईत आलेल्या आणि कॉमेंट्रीची धुरा संभाळणाऱ्या परदेशी खेळाडूंनी मराठमोळ्या पदार्थांवर ताव मारल्याचं पाहायला मिळालं.

4/7

IPL 2024 Foreigner Players Eat At Mumbai Local Hotel

दादरमधील प्रकाश हॉटेलमध्ये स्टीव स्मिथ आणि स्टुअर्ट ब्रॉड या दोघांनी मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. या ठिकाणी त्यांनी थालीपीठ, साबुदाणा वडा, लस्सी, पुऱ्यांचा आस्वाद घेतल्याचं व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे.  

5/7

IPL 2024 Foreigner Players Eat At Mumbai Local Hotel

एका शूटनिमित्त स्टीव स्मिथ आणि स्टुअर्ट ब्रॉड हे दोघे दादारमधील सर्वात जुन्या आणि नावाजलेल्या हॉटेलपैकी एक असलेल्या 'प्रकाश हॉटेल'मध्ये भारतीय पदार्थांवर मस्त ताव मारला.

6/7

IPL 2024 Foreigner Players Eat At Mumbai Local Hotel

सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले असून दादरमधील अनेकांनी स्टीव स्मिथ आणि स्टुअर्ट ब्रॉड आपण नेहमी ज्या हॉटेलला भेट देतो तिथे येऊन आपल्या आवडीचे पदार्थ खातात हे पाहणं फारचं छान अनुभव असल्याचं म्हटलं आहे.  

7/7

IPL 2024 Foreigner Players Eat At Mumbai Local Hotel

दरम्यान, राजस्थानकडून पराभूत झालेल्या मुंबईचा पुढील सामना 7 एप्रिल रोजी वानखेडेच्या स्टेडिमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.