10 मॅचमध्ये 8 शतकं, 90+ स्ट्राइक रेट, IPL गाजवायला 'तो' येतोय... मित्राची टीम लावणार बोली? किंमत...

IPL 2025 Auction 8 century In 10 Matches: या क्रिकेटपटूचं बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील नामांकित क्रिकेटपटूबरोबरचं कनेक्शन सध्या चर्चेत असलं तरी या खेळाडूने स्वत:ला ज्या बेस प्राइजवर लिस्ट केलं आहे ती सुद्धा चांगलीच चर्चेत आहे. या खेळाडूबद्दल जाणून घेऊयात...

| Nov 13, 2024, 15:56 PM IST
1/14

agnidevchopra

इंडियन प्रिमिअर लिगच्या आगामी पर्वासाठी या तरुण खेळाडूने स्वत:चं नाव नोंदवलं आहे. या खेळाडूच्या कामगिरीची आकडेवारी पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. या खेळाडूचं बॉलिवूड आणि क्रिकेट कनेक्शन चर्चेत आहे. जाणून घेऊयात या खेळाडूबद्दल...

2/14

agnidevchopra

शतक झळकवणारी मशीन, धावांचा रतीब घालणारा फलंदाज अशी अवघ्या 10 सामन्यांमध्ये ओळख मिळवणाऱ्या खेळाडूने आयपीएल 2025 च्या लिलावासाठी स्वत:चं नाव नोंदवलं आहे.  

3/14

agnidevchopra

वडील स्वत: एक प्रसिद्ध दिग्दर्शक असताना केवळ क्रिकेट या खेळावरील प्रेमापोटी सारं काही सेट असताना मेहनतीच्या जोरावर अल्पावधीत यश संपादन करणाऱ्या या तरुण क्रिकेटपटूची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.   

4/14

agnidevchopra

केवळ खेळाची आवड नाही तर त्यामध्ये उत्तम कामगिरी करता यावी म्हणून खेळाचा केलेला अभ्यास आणि तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी त्याने केलेली मेहनत त्याच्या खेळातून दिसून येतं.   

5/14

agnidevchopra

या खेळाडूची क्षमता यावरुनच लक्षात येईल की त्याने आपल्या पहिल्या 10 सामन्यांमध्ये 8 शतकं झाळकावली आहेत. कोणत्याही स्तरावर क्रिकेट खेळताना एवढ्या धावा करणं सोपं काम नाही. मात्र त्याने हे करुन दाखवलं आहे.  

6/14

agnidevchopra

ज्या क्रिकेटपटूबद्दल आपण बोलतोय तो क्रिकेटपटू म्हणजे, 'मुन्नाभाई' फेम दिग्दर्शक विधू विनोद चोप्राचा मुलगा अग्नि चोप्रा!  

7/14

agnidevchopra

अग्नि चोप्राने ज्या सामन्यामध्ये शतक झळावलं आहे ते मर्यादित षटकांचे सामने नव्हते. अर्थात आयपीएलमध्ये मर्यादित षटकाचे सामने खेळले जात असले तरी अग्नि चोप्राचं शॉट सिलेक्शन आणि फलंदाजीचं तंत्र उत्तम आहे.  

8/14

agnidevchopra

अग्नि चोप्राने लाल बॉलने खेळल्या जाणाऱ्या अमर्याद षटकांच्या क्रिकेटमध्येच 10 सामन्यांत 8 शतकं झळकावली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 10 सामन्यांमध्ये 92.11 च्या सरासरीने 1658 धावा केल्या असून त्यातच या 8 शतकांचा समावेश आहे.  

9/14

agnidevchopra

26 वर्षीय अग्नि चोप्राने 2025 च्या आयपीएल लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं आहे. भारत आणि परदेशामधील 1574 खेळाडूंच्या यादीत अग्नि चोप्राचेही नाव आहे.   

10/14

agnidevchopra

शतकांचा पाऊस पाडणाऱ्या अग्नि चोप्राने आपली बेस प्राइज 30 लाख रुपये इतकी ठेवली आहे. त्याला चांगली बोली मिळाली तर पहिल्यांदाच तो आयपीएलमध्ये खेळताना पाहायला मिळेल.

11/14

agnidevchopra

आता अग्नि चोप्रावर कोण बोली लावणार असा प्रश्न पडला असेल तर त्याचं पहिलं उत्तर गुजरात टायटन्स असं देता येईल. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आहे. शुभमन आणि अग्नि हे फार चांगेल मित्र आहेत.  

12/14

agnidevchopra

अग्नि चोप्राने नुकताच आपला 26 वा वाढदिवस साजरा केला तेव्हा शुभमन गिल त्याच्या बहिणीसहीत अग्नि चोप्राच्या घरी बर्थ डे पार्टीसाठी गेला होता.  

13/14

agnidevchopra

अग्नि चोप्रा हा मधल्या फळीमध्ये डावाला स्थैर्य मिळवून देणारा फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच केवळ त्याच्या मित्राचा संघ नाही तर इतर संघांच्याही तो टार्गेटवर असेल यात शंका नाही.  

14/14

agnidevchopra

विशेष म्हणजे अग्नि चोप्राने त्याची बेस प्राइज तुलनेनं फार कमी ठेवल्याने त्याच्यावर चांगली बोली लावण्याची संधी संघांकडे आहे.