IPL मधील Mistry Girl ला दक्षिण आफ्रिकेतील सामन्यादरम्यान केलं 'प्रपोज'; 'तो' बॅनर चर्चेत

CSA T20 League: दक्षिण आफ्रिके टी-20 लीग 2023 मध्ये एकूण 6 संघांनी भाग घेतला असून त्यामध्ये सनराइजर्स ईस्टर्न केप नावाच्या संघाचाही समावेश आहे. या संघाच्या मालकीण आहेत काव्या मारन (Kaviya Maran). काव्य मारन यांची सर्वात आधी चर्चा इंडियन प्रिमियर लिग 2018 च्या वेळेस सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यामध्ये संघाला चेअर करतानाचे व्हिडीओ समोर आले तेव्हा झाली होती. काव्या मारन यांचे चाहते केवळ भारतात नसून परदेशातही असल्याची झलक दक्षिण आफ्रिकेमध्ये पहायला मिळाली. 

Jan 20, 2023, 16:28 PM IST
1/5

IPL Mistry Girl Kaviya Maran Gets Marriage Proposal

IPL Mistry Girl Kaviya Maran Gets Marriage Proposal

काव्या मारन (Kaviya Maran) 19 जानेवारी रोजी सनरायझर्स ईस्टर्न कॅप आणि पार्ल रॉयल्सचा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होत्या. या सामन्यामध्ये एका दक्षिण आफ्रिकन क्रिकेट चाहत्याने काव्या मारन (Kaviya Maran) यांना लग्नाची मागणी घातली. या प्रपोजलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

2/5

IPL Mistry Girl Kaviya Maran Gets Marriage Proposal

IPL Mistry Girl Kaviya Maran Gets Marriage Proposal

लाइव्ह सामन्यादरम्यान कॅमेरामनने एका चाहत्याच्या हातात असलेल्या बोर्डवर फोक केलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चाहत्याने या बोर्डवर, "काव्या मारन, तुम्ही माझ्याशी लग्न करणार का?" असं लिहिलं होतं. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

3/5

IPL Mistry Girl Kaviya Maran Gets Marriage Proposal

IPL Mistry Girl Kaviya Maran Gets Marriage Proposal

काव्या मारन (Kaviya Maran) सन ग्रुपच्या (Sun Group) मालकीण कलानिधि मारन (Kalanithi Maran) यांच्या कन्या आहेत. सनरायझर्स हैदराबाद ही सन ग्रुपच्या  (Sun Group) मालकीचाच संघ आहे. काव्या मारन (Kaviya Maran) कलानिधि मारन (Kalanithi Maran) यांची बेटी आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांची भाची आहे.

4/5

IPL Mistry Girl Kaviya Maran Gets Marriage Proposal

IPL Mistry Girl Kaviya Maran Gets Marriage Proposal

30 वर्षीय काव्या मारन (Kaviya Maran) स्वत: सन म्यूझिक (Sun Music) कंपनीचं काम पाहतात.  त्या पहिल्यांदा 2018 साली चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरल्या होत्या. काव्या मारन दरवर्षी आयपीएलदरम्यान चर्चेचा विषय ठरतात.

5/5

IPL Mistry Girl Kaviya Maran Gets Marriage Proposal

IPL Mistry Girl Kaviya Maran Gets Marriage Proposal

काव्या मारन (Kaviya Maran) यांनी एमबीएपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्या वडिलोपार्जित उद्योगांमध्ये कार्यरत झाल्या. काव्या आपल्या कंपनीमधील कोणत्याही मोठ्या पदावरील जबाबदारी स्वीकारण्याआधी सन टीव्ही नेटवर्कमध्ये इंटर्नशिप करायच्या. काव्या मारन (Kaviya Maran) सध्या सन टीव्ही नेटवर्किमधील ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्टच्या (Sun NXT) प्रमुख आहेत.