Photos: अंबानी कुटुंबियांच्या लेकीनं वेधलं लक्ष, भावाच्या लग्नासाठी केलेला खास साजशृंगार पाहा तरी...

Isha Ambani : सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चेट यांच्या लग्नाची. सध्या या लग्नात सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले ते म्हणजे ईशा अंबानीच्या लुकनं. अंबानी कुटुंबियांच्या लेकीचा हा नवा लुक तुम्ही पाहिलात का? 

Jan 20, 2023, 14:45 PM IST

Isha Amani Photos: अंबानी कुटुंबियांचा राजेशाही थाट काही कोणाला नवीन नाही. त्यातून त्यांच्या लेकी-सुनाही स्वर्गातील अप्सरांच्यापेक्षा कमी नाहीत. सध्या अनंत अंबानीच्या लग्नसभारंभाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे येथे सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे लग्नाच्या फॅशनची. 

1/5

Photos: अंबानी कुटुंबियांच्या लेकीनं वेधलं लक्ष, भावाच्या लग्नासाठी केलेला खास साजशृंगार पाहा तरी...

isha ambani lehenga

अंबानी कुटुंबियांमध्ये सध्या लग्नाचा माहोल आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लुक हे फार राजेशाही आणि आकर्षक दिसत आहेत. सध्या या सगळ्यात अंबानी कुटुंबियांची लेक ईशा अंबानी ही फारच सुरेख दिसते आहे. ईशा अंबानीचा नवा लुक पाहून सगळेच घायाळ झाले आहेत. 

2/5

Photos: अंबानी कुटुंबियांच्या लेकीनं वेधलं लक्ष, भावाच्या लग्नासाठी केलेला खास साजशृंगार पाहा तरी...

isha ambani new look goes viral

सध्या तिचा लेटेस्ट फोट सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. या नव्या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या या ड्रेसची सगळीकडेच चर्चा आहे. या नव्या लुकमध्ये तिचा ग्लॅमरस लुक हा चर्चचा विषय ठरतो आहे. तिचा साजशृंगार पाहून महागडा ड्रेस घालूनही ती किती सुंदर दिसते आहे अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. 

3/5

Photos: अंबानी कुटुंबियांच्या लेकीनं वेधलं लक्ष, भावाच्या लग्नासाठी केलेला खास साजशृंगार पाहा तरी...

anant ambani isha ambani

तिचा हा लेहेंगा गुलाबी आणि पिस्ता रंगाचा आहे. त्यावर सोनेरी पद्धतीनं नक्षीकाम केल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातून तिचा सिंपल एलिगंट मेकअपही खूप सुंदर वाटतो आहे. त्याचसोबत तिनं जड अशी ज्वेलरी घातली आहे जी कुंदनाची आहे. 

4/5

Photos: अंबानी कुटुंबियांच्या लेकीनं वेधलं लक्ष, भावाच्या लग्नासाठी केलेला खास साजशृंगार पाहा तरी...

anant amabani wedding

अबू जानी आणि संदीप खोसला यांनी यावेळेस अंबानी कुटुंबियांच्या लग्नासाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. यावेळी सगळ्यांच्या नजरा या जास्त करून अंबानी कुटुंबियांच्या लेकीकडे वळल्या होत्या. 

5/5

Photos: अंबानी कुटुंबियांच्या लेकीनं वेधलं लक्ष, भावाच्या लग्नासाठी केलेला खास साजशृंगार पाहा तरी...

isha ambani wedding look

सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ईशाचे स्टाईलिंग ज्यांनी केले त्यांनी तिचा लुकचा फोटो सोशल मीडियावर टाकला आहे.