IPL : एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन करणारा फलंदाज कोण?

IPL Records : नुकत्याच झालेल्या दिल्लीविरूद्ध कोलकत्याच्या सामन्यात ऋषभ पंतने वेंकटेश अय्यरच्या ओव्हरमध्ये 28 धावा  काढल्या, पण तूम्हाला माहित आहे का, की कोणत्या टॉप 5 फलंदाजांनी 1 ओव्हरमध्ये सर्वात जास्त धावा बनवल्या आहेत?  

Apr 04, 2024, 20:58 PM IST
1/5

1. ख्रिस गेल -

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा धाकड फलंदाज ख्रिस गेलने आयपीएल 2011 मध्ये कोची तस्कर्स केरलाविरूद्ध प्रशांत परमेश्वरनच्या ओव्हरमध्ये 36 धावा ठोकल्या होत्यात.

2/5

2. रविंद्र जडेजा -

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा याने हर्षल पटेलच्या ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूविरूद्ध एका ओव्हरीत 5 षटकार लावून 37 धावा लूटल्या होत्या, जडेजाने हा कारनामा आयपीएल 2021 मध्ये केला होता.

3/5

3. पॅट कमिंस -

आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन असलेला पॅट कमिंस याने, 2022 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या डॅनियल सॅम्सविरूद्ध एका ओव्हरमध्ये तब्बल 35 रन ठोकले होते.  

4/5

4. सुरेश रैना -

चेन्नई सुपर किंग्सच्या चिन्ना थाला म्हणजेच सुरेश रैनाने आयपीएल 2014 मध्ये पंजाब किंग्सच्या परविंदर अवानाच्या ओव्हरमध्ये 33 धावा बनवल्या होत्या

5/5

5. विरेंद्र सेहवाग -

आयपीएल 2008 मध्ये विरेंद्र सेहवागने मुंबईच्या एंड्र्यू सायमन्ड्स च्या एका ओव्हरमध्ये ताबडतोब 30 धावा बनवल्या होत्या.