कुणबी समाजातुन OBC आरक्षण मराठ्यांना मान्य आहे का?

मराठा आरक्षाचा प्रश्न सोडवण्याचा मोठा पेच सरकार समोर निर्माण झाला आहे. 

Sep 04, 2023, 23:13 PM IST

maratha reservation : जलाना येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठ्यांना कुणबी समाजातुन OBC आरक्षण देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कुणबी समाजातुन OBC आरक्षण मराठ्यांना मान्य आहे का?

1/7

मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचं मान्य करण्यास नकार दिला. त्यामुळं मराठा समाजाला दिलेलं SEBC आरक्षण रद्द झालं. आता ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देणं हा एकमात्र पर्याय उरल्याचं मानलं जातंय.

2/7

मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. 

3/7

कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास त्यांची नोंद इतर मागासवर्गात होईल.

4/7

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकारने मोठं पाऊल टाकलंय...मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समिती स्थापन झालीय. 

5/7

मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत समिती चर्चा करणार आहे. 

6/7

मराठ्यांना कुणबीत समावेश ओबीसींना मान्य आहे का? 

7/7

मराठ्यांना कुणबी मान्य आहे का?