चंद्रावर पाणी आहे की नाही? जीवन आहे की नाही? चांद्रयान 3 मोहिमेत रहस्य उलगडणार

चंद्रावर लँडर सुरक्षितरित्या उतरलं की ते चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल. भारताच्या गौरवशाली वैज्ञानिक इतिहासातला महत्त्वाचा टप्पा असेल. 

Aug 23, 2023, 00:00 AM IST

Chandrayaan-3 : भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी टप्प्यात आली आहे. विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित उतरवणं. प्रज्ञान रोवर चंद्रावर चालवून दाखवणं आणि त्यांच्या मदतीनं चंद्रावर वैज्ञानिक परीक्षण करणं हा या मोहिमेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. चंद्रावर पाणी आहे की नाही? जीवन आहे की नाही? चांद्रयान 3 मोहिमेत अनेक रहस्य उलगडणार आहेत. 

1/5

भारताची ही मोहीम फत्ते झाली तर त्याचा लाभ नासासह जगभरातील विविध अंतराळ संशोधन संस्थांना होणार आहे. 

2/5

चंद्रावर मानवी वस्ती शक्य आहे का, याचाही अभ्यास केला जाणार आहे. 

3/5

विविध प्रकारचं खनिजं देखील चंद्रावर असण्याची शक्यता आहे.

4/5

चंद्रावर जीवन आहे की नाही, हे शोधण्यासाठी चांद्रयान 3 महत्त्वाचं ठरणार आहे. 

5/5

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी असण्याची शक्यता आहे.