Isro Jobs Salary : जगभरात भारताचं नाव उंचावणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचा पगार नेमका किती? पाहा एका क्लिकवर

Aug 23, 2023, 18:43 PM IST
1/7

भारतीय शास्त्रज्ञांनी जे NASA ला जमलं नाही ते करून दाखवलं आहे.

2/7

चंद्रयान 3 चं अखेर आज चंद्रावर लँडिंग झाला आहे. देशासाठी अतिशय ऐतिहासिक अशा या क्षणाचे साक्षीदार आपण सगळेच आहोत.

3/7

चांद्रयान 3 मोहिमेच्या निमित्ताने या मोहिमेसाठी मोलाचं योदगान देणारे अनेक चेहरे समोर आलेत. यावेळी आणखी एक चर्चा रंगली ती म्हणजे या शास्त्रज्ञांच्या नोकऱ्यांची आणि इस्रोतून त्यांना मिळणाऱ्या पगाराची.

4/7

जगात भारताचं नाव उंचावणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आज डोळे दीपवून टाकणारी कामगिरी केली. मात्र यावेळी सर्वंना प्रश्नच पडला, इतक्या कोट्यवधींच्या मोहिमांचं नेतृत्त्वं करणाऱ्या या मंडळींना किती पगार असेल?  

5/7

मिळालेल्या माहितीनुसार इस्रोमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणीच्या लेव्हल 10 मध्ये Scientist ‘SC’ पदी सेवेत असणाऱ्यांना दर महिन्याला किमान 56,100 रुपये इतकं वेतन अपेक्षित असतं. 

6/7

नोकरीवर रुजू झालेल्या उमेदवारांना प्रोबेशन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ISRO सायंटिस्टचं पद, त्यासाठीचे भत्ते आणि इतर सुविधांचा लाभ घेता येतो. 

7/7

इस्रोमध्ये नोकरी लागल्यास पदानुसार मिळणारा पगार आणि त्यासाठी भत्ते यांची आखणी कऱण्यात येते. यावेळी सुरुवातीचं वेतन 56100 रुपये प्रतिमहिना असून, बंगळुरूमध्ये इच्छुकांना नोकरीसाठी जावं लागतंय. या पगारांमध्ये घर भाडं, मगाहाई भत्ता, वैद्यकीय भत्ता, वाहतूक भत्ता, विमा, प्रवास सवलती, पेन्शन योजना, हाऊस बिल्डींग अलाऊन्स या आणि अशा इतर भत्त्यांचा समावेश असतो.