Jaggery Milk : कोमट दूधासोबत गुळ मिसळणं योग्य की अयोग्य?

Jaggery : हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि ताप येणे हे अनेकांना होतं असतं. त्यामुळे हिवाळ्यात आपण कोमट दूध, हळदीचं दूध घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पण जर तुम्ही दूध आणि गुळ एकत्र घेतं असाल तर आधी ही बातमी वाचा.   

Nov 28, 2022, 07:24 AM IST

Jaggery With Milk Benefits : हिवाळ्यात (winter) अचानक बदलेलं वातावरण आणि त्यात वाढलेली थंडी यामुळे अनेकांना सर्दी, खोकला सारखे आजारपण त्रास देतात. त्यात राज्यात गोवरने (Measles) थैमान घातलं आहे. त्यामुळे तज्ज्ञ लोकांना पौष्टिक खाणेपिणे, काढा, जास्त प्रमाणात पालेभाज्या आणि फळं खाण्याचा सल्ला देतात. लोक आजकाल आपल्या आरोग्याबद्दल खूप जागृत झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी आपल्या दैनंदिन आयुष्यातून साखरेला हद्दपार केलं आहे. गुळाचा चहा (Jaggery tea), गोड पदार्थांमध्ये गुळाचा वापर वाढला आहे. अनेक जण कोमट दुधासोबत गुळ असंही घेतात. दूध आणि गूळ हे चांगले कॉम्बिनेश मानलं जातं. त्यामुळे अनेक जण दूध आणि गूळ एकत्र घेतात. पण काही लोकांनी कोमट दूध आणि गूळ एकत्र घेणे त्यांचा आरोग्यासाठी धोकादायक आहे. तर काही लोकांसाठी कोमट दूध आणि गुळ हे वरदान ठरतं. (jaggery with warm milk Is it right or wrong health tips)

1/6

jaggery with warm milk Is it right or wrong health tips nmp

 शरीरात रक्ताची कमतरता असल्यास गूळ खाऊन त्याचे प्रमाण  वाढवणं फायदेशीर आहे. (Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

2/6

jaggery with warm milk Is it right or wrong health tips nmp

अस्थमाच्या रूग्णांसाठी गूळ आणि दूधाचे मिश्रण फायदेशीर ठरते. थंड वातावरणात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण करण्यास मदत करते. यामुळे कफचा त्रास कमी होतो.  

3/6

jaggery with warm milk Is it right or wrong health tips nmp

  जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या दूर करायची असेल तर तुम्ही गुळाच्या दुधाचे सेवन करु शकता. 

4/6

jaggery with warm milk Is it right or wrong health tips nmp

गुळ हे गरम असतं, त्यामुळे उष्ण लोकांनी कोमट दुधासोबत गुळ पिऊ नये. अन्यथा त्यांना नाकातून रक्त येणे यासारख्या समस्या होऊ शकतात.   

5/6

jaggery with warm milk Is it right or wrong health tips nmp

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जास्त प्रमाणात गुळ खाऊ नये. 

6/6

jaggery with warm milk Is it right or wrong health tips nmp

मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाचे जास्त सेवन करु नये. कारण यामुळे तुमच्या शरीरात साखरेची पातळी वाढण्याची भीती असते.