जामनेरमध्ये शेखच 'सिकंदर' अन् चौधरीचाच 'विजय' , नमो कुस्ती महाकुंभात उसळला कुस्तीप्रेमीचा जनसागर
जामनेर : नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचाचा जयघोष करत नमो कुस्ती महाकुंभात खानदेशातील लाखो प्रेक्षकांनी कुस्तीचा थरार याची देही अनुभवला. मुंगी शिरायलाही जागा नसलेल्या जामनेरमधल्या स्टेडियममध्ये सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh), सायगावचा विजय चौधरी (Vijay Choudhari) आणि पंजाबच्या प्रीतपालच्या कुस्तीचा मनमुराद थरार कुस्तीप्रेमींना तब्बल सात तास घेतला.
राजीव कासले
| Feb 12, 2024, 19:26 PM IST
1/7

कुस्तीच्या जनसागरात तब्बल 7 तास चाललेल्या या कुस्ती दंगलमध्ये सोलापूरचा सिकंदर शेखने जम्मू काश्मीरच्या बिनिया मिनला छडी टांग लावत अस्मान दाखविले. या कुस्तीसाठी पंच म्हणून स्वतः ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन हे होते. सायगावच्या विजय चौधरी विरुद्ध मुस्तफा खान या अटीतटीच्या लढतीत मुस्तफाला विजयने घुटना डावावर चितपट केले. यावेळी संपूर्ण स्टेडियममधील प्रेक्षकांनी उभे राहू आपल्या भागातील खेळाडूचा जयघोष केला. संपूर्ण स्टेडियममध्ये आतषबाजी करण्यात आली.
2/7

3/7

4/7

माऊली जमदाडे आणि जतींदर सिंह यांच्यातील संघर्षही संपता संपत नव्हता. दोघेही तोडीस तोड असल्यामुळे ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. बाबर पैलवानवर मोनू खुराणाने मात केली. सत्येन्द्र मलिकने काका जम्मूला चितपट केले. महाराष्ट्राच्या समीर शेखने कलवा गुज्जरला हरवले तर महेंद्र गायकवाडने मनजीत खत्रीला अस्मान दाखवले.
5/7

6/7

या मैदानात 150 मल्लांनी आपल्या खेळाचे प्रदशर्न करून कुस्तीप्रेमींची मने जिंकली. या सर्व विजेत्या पैलवानांना मंत्री गिरीष महाजन यांनी 15 गदा, मानाचा 'नमो कुस्ती महाकुंभ' चा पट्टा आणि लाखोंचे बक्षिसे देऊन गौरविलं. या मैदानासाठी पंच राजा पैलवान, सत्यदेव मलिक हे उपस्थित होते. हे मैदान पार पाडण्यासाठी संयोजक रोहित पटेल, विजय चौधरी, दत्तात्रय जाधव, वेंकटेश अहिरराव, दत्तू माळी, यशोदीप चौधरी यांनी काम पहिलं.
7/7
